युवासैनिक आकाश अशोक पांचाळ यांच्या तर्फे जिनिअस मैत्रकूल कडापे येथे जीवनावश्यक वस्तूंची मदत

 युवासैनिक आकाश अशोक पांचाळ यांच्या तर्फे जिनिअस मैत्रकूल कडापे येथे जीवनावश्यक वस्तूंची मदत

पोलीस प्रवाह न्यूज

 माणगांव-दि. २६- उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, युवासेना सचिव वरून सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली युवासैनिक आकाश अशोक पांचाळ यांच्या तर्फे जिनिअस मैत्रकूल कडापे येथे दि. २५ फेब्रुवारी रोजी जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली.

युवासैनीक आकाश पांचाळ यांचे सामाजिक क्षेत्रात कार्य अग्रेसर आहे. त्यांच्यामार्फत अनेक गरीब व गरजू लोकांना वेळोवेळी मदत करण्यात येते.   रायगड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात त्यांचे समाजकार्य सुरू आहे. लवकरच गरीब व गरजू लोकांसाठी चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन करणार असून जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहचून त्यांना मदत करण्याचे काम सुरू आहे.

यावेळी युवासैनिक आकाश अशोक पांचाळ, शिवसेना सोशल मीडिया समन्वयक महाराष्ट्र राज्य प्रतिक साळुंके, अभिषेक पताले, सुधीर सोनावणे, अजय यादव व जिनिअस मैत्रकूल मुले उपस्थित होती.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या