जागरूक पालक : सुदृढ बालक योजने अंतर्गत उतेखोल शाळेत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी.
पोलीस प्रवाह न्यूज
माणगाव : दि.९ - राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र,जिल्हा रुग्णालये,उपजिल्हा रुग्णालये यांच्यामार्फत संपूर्ण राज्यभर जागरूक पालक.. सुदृढ बालक ही योजना राबविण्यात आली.
अशाच प्रकारे माणगांव उपजिल्हा रुग्णालय व RBSK पथक माणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने माणगांव मधील तालुका शाळा उतेखोल येथे 0 ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
या वेळी उपस्थित पालकांना मार्गदर्शन देखील करण्यात आले. तसेच विशेषतः या तपासणी चा फायदा गरीब व गरजू विद्यार्थ्यांना कसा होइल हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .या कार्यक्रमाचे उद्घाटन माणगांव उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ दिलीप पगारे यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी उपजिल्हा रुग्णालय माणगांव मधील राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम पथक डॉ चैत्राली पवार , डॉ मोहित नागडा , डॉ किरण कराड , डॉ तेजल गायकवाड , औषध निर्माता दर्पण मोरे, महेश पवार , सिस्टर मिनाक्षी जाधव , समीक्षा सापळे व शाळेच्या मुख्याध्यापिका सायली अंबुरले,शिक्षिका अस्मिता खडतर व केंद्रप्रमुख संजय निजापकर हे उपस्थित होते.




0 टिप्पण्या