माणगांवमध्ये प्रबोधन कौशल्य केंद्राचा दिमाखदार भूमीपूजन सोहळा संपन्न

 माणगांवमध्ये प्रबोधन कौशल्य केंद्राचा दिमाखदार भूमीपूजन सोहळा संपन्न

पोलीस प्रवाह न्यूज

माणगांव-दि.- १०-  माणगांवमध्ये बामणोली रोडवर असणाऱ्या प्रबोधन कौशल्य निकेतनच्या म्हणजेच ग्रामीण युवकांना रोजगारक्षम बनविणाऱ्या प्रबोधन कौशल्य केंद्राच्या प्रस्तावित इमारतीचा भूमिपूजन सोहळा दि. १० फेब्रुवारी रोजी  १२ वाजता पार पडला.

भूमिपूजन पूजा प्रबोधन गोरेगावचे संस्थापक माजी उद्योगमंत्री आ. सुभाष देसाई, अध्यक्ष नितीन शिंदे यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाची प्रस्तावना निवेदिका स्मिता आपटे यांनी केली यानंतर माणुसकी जीवनावर आधारित "माणसाने माणसासाशी माणसा सम वागणे!" ही प्रार्थना म्हणजे स्वागतगीत प्रबोधन कौशल्य निकेतन पहल नर्चरिंग लाईव्हज च्या विद्यार्थ्यांनी सादर केले. त्यानंतर प्रबोधन कौशल्य व पहलमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची मनोगते झाली. विशेष करून या मनोगतामधील सोनल आणि कविता वाघमारे यांची मनोगते भावूक ठरली. सोनलला तर कौटुंबिक विरोधी परिस्थिती मांडताना अश्रू अनावर झाले.


या कार्यक्रमाच्या मनोगतामध्ये बोलताना माजी उद्योग मंत्री आ. सुभाष देसाई यांनी विद्यार्थ्यांच्या मनोगताचेच दाखले दिले. यावेळी बोलताना आ. देसाई म्हणाले की, दिव्याने दिवा प्रज्वलित करावा अशा मताची मनोगते "पहल" च्या विद्यार्थ्यांची आहेत. त्यामुळे शासनाने प्रत्येक तालुक्यात कौशल्य विकास केंद्रे स्थापन करावीत जेणेकरून बेरोजगारी कमी होईल आणि युवक व युवती  आपला स्वतःचा व्यवसाय करतील यावेळी पहिले प्रबोधन कौशल्य केंद्र चालू करण्यासाठी साथ देणाऱ्या रायगड सह रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड या दुर्गम तालुक्यापर्यंत शिक्षणाची गंगा पोंहचविणारे जे सावंत एज्युकेशन सोसायटीचे चे सचिव जयवंत (नानासाहेब) सावंत यांचे विशेष आभार मानले.

या कार्यक्रमामध्ये व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून आ. सुभाष देसाई यांच्यासह शेठ दा. जैन धर्म स्थानकचे विश्वस्त भरतभाई शहा, नानासाहेब सावंत, महानगर गॅसचे व्हाईस प्रेसिडेंट एच आर आणि सी एस आर एम जी एल, त्याचप्रमाणे योगेश लाधिया, उमेश सावंत हे देखील उपस्थित होते.

या कार्यक्रमात माणगांव तालुक्यातील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ आबासाहेब पाटणकर, डॉ. मदन निकम, डॉ. संताजी यादव  आणि माणगांव उपजिल्हा रुग्णालयात "सदैव सेवेसी तत्पर"असे व्रत बाळगलेले डॉ संतोष कामेरकर तसेच  शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख अनिलजी नवगणे आदी उपस्थित होते. पहलचे विद्यार्थी जिथे ojt ऑन जॉब ट्रेनिंग साठी शिफ्ट झाले त्या हवेल्स कंपनीचे प्रतिनिधी भारत उतेकर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करत "पहल"आणि प्रबोधनचे तोंडभरून कौतुक केले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या