महाड एम आय डी सी मध्ये मल्लक स्पेशालिटी केमिकल कंपनीमध्ये भीषण स्फोट
पोलीस प्रवाह न्यूज
महाड-दि.- ८- महाड औद्योगिक क्षेत्रातील मल्लक स्पेशालिटी कंपनीमध्ये स्फोट झाल्याची घटना दि. ८ फेब्रुवारी रोजी घडली आहे.
कारखान्यातील ई ओ प्लॅन्टला भीषण आग लागली असून आग विझवण्य साठी पाच अग्नीशमन दलाच्या गाड्या घटना स्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवणण्याचे अथक प्रयत्न सुरु आहेत. छोटे छोटे स्फोट होत असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात अवघड होत असून अगिवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
कारखान्यातील कामगारांना कारखान्या बाहेर पाचारण करण्यात आले असून या स्फोटात चार कामगार किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर महाड औद्योगिक क्षेत्रातील एम एम ए हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. तर या परीसरात स्फोटा मुळे आगीचे आणी धुराचे लोळ पसरले असुन परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.



0 टिप्पण्या