माणगांव म्हसेवाडी येथे ६९ वर्षीय महिलेचा खून

 माणगांव म्हसेवाडी येथे ६९ वर्षीय महिलेचा खून 

पोलीस प्रवाह न्यूज

माणगांव-दि.२२- माणगांव तालुक्यातील भिरा विभागातील म्हसेवाडी येथे ६९ वर्षीय महिलेचा खून झाल्याची घटना घडली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, दि. २१ फेब्रुवारी रोजी दुपारी १.३० ते ३.१५ वा. च्या दरम्यान मौजे म्हसेवाडी गावच्या हद्दीत फिर्यादी विनोद श्रीरंग सावंत, रा. म्हसेवाडी यांच्या घरी त्यांची आई संगीता श्रीरंग सावंत, वय ६९ वर्षे ह्या घरात एकटीच असताना  संशयित आरोपी यांनी घरात प्रवेश केला. घरातील मोरीत असलेल्या पाण्याने भरलेल्या टपात संगीता सावंत यांची माण पकडून तोंड व नाक टपात बुडवून श्वासोच्छ्वास बंद केला. संशयित आरोपी यांनी संगीता सावंत यांच्या कानातील सोन्याची कुडी जबरदस्तीने खेचून काढली. तसेच गळ्यातील सोन्याची माळ व सोन्याच्या बांगड्या जबरदस्तीने खेचुन दुखापत करून जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने संगीता सावंत यांना ठार मारले.

या घटनेची नोंद माणगांव पोलीस ठाणे येथे कॉ. गु. र. नं. ४३/२०२३ भा. दं. वि. सं. क. ३०२, ३९४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो. नि. राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स. पो. नि. मोहिते करीत आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या