सर्वसामान्य ग्रामीण माता भगिनींच्या डोक्यावरील हंडा खाली आणण्याचे काम महाविकास आघाडी सरकारनेच केले -खासदार सुनिल तटकरे.
अंदाजित रक्कम १२ कोटी ६० लाखाच्या उणेगाव, पळसगाव नळपाणी पुरवठा योजनेचा भव्य दिव्य असा भूमिपूजन सोहळा संपन्न.
पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव-दि. १३- राज्यातील ग्रामीण भागातील जनतेला घर तिथे नळ आणि माता भगिनींच्या डोक्यावरील हंडा खाली आणण्याचे काम अर्थाने महाविकास आघाडी सरकारनेच केले आहे, असे वक्तव्य खासदार सुनिल तटकरे यांनी माणगांव तालुक्यातील लोणेरे गोरेगाव विभागात असणारी ग्रामपंचायत उणेगाव तसेच महाड पोलादपूर माणगांव विधानसभा मतदारसंघात असलेली ग्रामपंचायत पळसगाव यांच्यासाठी रक्कम १२ कोटी ६० लाख रक्कमेच्या जलजीवन मिशन अंतर्गत प्रादेशिक पाणीपुरवठा योजना मधून मंजूर झालेल्या उणेगाव पळसगाव नळपाणी योजनेचे भूमिपूजन खासदार सुनिल तटकरे व माजी पालकमंत्री आम. आदीती तटकरे यांच्या हस्ते दिनांक १३ फेब्रुवारी रोजी उणेगाव ग्रामपंचायतच्या भव्य प्रांगणात पार पडले. मान्यवरांची खालूबाजा आणि ढोल-ताश्याच्या गजरात व लेझिम पथकाच्या ठेक्यावर मिरवणूक काढण्यात आली.
या कार्यक्रमाला व्यासपीठावर खासदार सुनिल तटकरे यांच्या समवेत आम. अदिती तटकरे, माणगांव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष केकाणे, तालुका महिला आघाडी अध्यक्षा संगिता बक्कम, जेष्ठ नेते इकबाल धनसे, पंचायत समिती सदस्य शैलेश भोनकर, शांताराम भोरावकर (गुरुजी), चिंचवली ग्रामपंचायत सरपंच नंदू पारावे, उपसरपंच किशोर तटकरे, सदस्य विलास वसंत यादव, उणेगाव ग्रामपंचायत सरपंच राजेंद्र शिर्के, लोणशी ग्रामपंचायत सरपंच दीपाली चेरफळे, माणगांव नगरपंचायत माजी नगराध्यक्ष आनंद यादव, होडगाव ग्रामपंचायत सरपंच बळीराम खाडे, पळसगाव सरपंच प्रज्ञा सुर्वे, राष्ट्रवादी युवक काँगेसचे संतोष (भाई ) दसवते, राहुल दसवते यांच्या सह माणगांव तालुक्यातील विविध विभाग म्हणजे लोणेरे गोरेगाव विभाग, मोर्बा, साई, मांजरोणे विभाग, इंदापूर विभाग, निजामपूर विळे विभाग या ठिकाणाहून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
या योजनेचे स्वरूप असे आहे की, ही योजना जलजीवन मिशन अंतर्गत अंदाजित रक्कम १२ कोटी ६० लाखांची ही योजना आहे. जलजीवन मिशन अंतर्गत प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. या योजनेत उणेगाव, आडघर, चापडी, वावे तर्फे निजामपूर, लोणशी, ढालघर, गारळ,तर भाग दोन मध्ये होडगाव, खर्डी खुर्द, पळसगाव बुद्रुक, विंचवली ही गावे समाविष्टीत करण्यात आली आहेत. तर या योजनेच्या साठवण टाक्या चापडी, लोणशी, गारळ, वावे तर्फे निजामपूर, आडघर, ढालघर या ठिकाणी करण्यात आलेल्या असुन जमिनिवरीलसाठवण टाकी ही उणेगावं येथे करण्यात आलेली आहे. या भव्य दिव्य अश्या योजेनेसाठी भरमसाठ असा निधी मंजूर करून दिल्याबद्दल सुनिल तटकरे व तत्कालीन पालकमंत्री व माजी राज्यमंत्री आ. अदिती तटकरे यांचे या विभागातुन कौतुक होत आहे.




0 टिप्पण्या