महाराष्ट्र राज्याचे नवे राज्यपाल महामहीम रमेश बैस

 महाराष्ट्र राज्याचे नवे राज्यपाल महामहीम रमेश बैस

पोलीस प्रवाह न्यूज

भारताच्या राज्यघटनेत घटकराज्य म्हणून गणिती असलेल्या महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आपल्या राज्यपाल पदावरून पायउतार झाल्यानंतर महामहिम रमेश बैस यांची  महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

सूत्रांकडून मिळलेल्या महितनुसार रमेश बैस यांचा राजकीय व सामाजिक प्रवास असा आहे की, रमेश बैस यांचा जन्म २ ऑगस्ट १९४७, १९७८ मध्ये रायपूर चे नगरसेवक, १९८० साली मध्यप्रदेश विधानसभा सदस्य, १९८९ साली रायपूर लोकसभेचे खासदार, सतत ७ वेळा खासदार म्हणून निवडून आले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळांत केंद्रीय मंत्री म्हणून काम पाहिले आहे. २०१९ त्रिपुरा राज्याचे राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे, तर २०२१ साली झारखंडचे राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे, असा हा रमेश बैस यांचा राजकिय व सामाजिक प्रवास आहे, असे अनुभवी राज्यपाल महाराष्ट्र राज्याला लाभल्याने शासकीय, प्रशासकीय, राजकिय व सर्वच क्षेत्रांतुन नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या