व्हॅलेंटाईन डे हा दिवस लव्ह फॉर आर्ट्स डे म्हणून डी आर माने कॉलेजमध्ये साजरा
कोल्हापूर-दि. १४- दि कागल एज्युकेशन सोसायटी संचलित डी आर माने महाविद्यालय, कागल येथे आज लव्ह फॉर आर्ट्स डे म्हणजे व्हॅलेंटाईन डे हा दिवस महाविद्यालयामध्ये कला प्रेम दिवस म्हणून दरवर्षी संपन्न होत असतो. आजही महाविद्यालयामध्ये अकरावीपासून पदव्युत्तर पर्यंत सर्व शाखांकडील सर्व कलाकार विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. यामध्ये विद्यार्थ्यांनी पेन्सिल स्केचेस, पेंटिंग्स, मधुबनी कला, वारली कला, ग्लास पेंटिंग, एम्ब्रॉयडरी, क्विलिंग, फॅब्रिक पेंटिंग, भरत काम, फोटोग्राफी, टाकाऊतून टिकाऊ कलाकृती तयार करणे अशा विविध कला प्रकारांमध्ये आपल्या कलाकृती प्रदर्शित केल्या.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रवीण चौगले यांच्या हस्ते या कलाप्रदर्शनाचे उद्घाटन झाले. या कलाप्रदर्शनच्या विभाग प्रमुख डॉ. नीला जोशी यांनी प्रास्ताविक केले. प्रा. राजेंद्र मोगणे यांनी विद्यापीठातील निसर्गाची छायाचित्रे काढून अतिशय सुंदर काव्यपंक्ती लिहून कॅलेंडर तयार केले आहे. त्याचे प्रकाशन प्राचार्य डॉ. प्रवीण चौगले यांच्या हस्ते करण्यात आले.
या कलाप्रदर्शनाला नाविद मुश्रीफ, भैय्यासाहेब माने, बिपिन माने तसेच अनेक मान्यवरांनी भेट दिली दिली. या कलाप्रदर्शनाचे परीक्षण प्रा. राजेंद्र मोगणे, प्रा. शार्दुल पाटील, प्रा. हसीना मालदार, प्रा. लतिका सावेकर, विवेक गिरी यांनी केले. यशोधन नियतकालिक सदस्य प्रा. मोगणै, प्रा. वाडीकर,बप्रा. श्रद्धा कासोटे, डॉ. कातवरे, प्रा. जयश्री जगताप, प्रा. संगीता एक्संबेकर, प्रा. तेजस्विनी शितोळे, प्रा. सर्जेराव नलवडे, प्रा. विनायक खोत आणि विद्यार्थी विद्यार्थिनींनी या कलाप्रदर्शनासाठी सहकार्य केले. प्रा. संदीप वाडीकर यांनी सर्वांचे आभार मानले.



0 टिप्पण्या