पुरार येथे एकता फाऊंडेशन संघटनेच्या माध्यमातून मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश सही मोहीम
माणगांव-दि. २१- मुंबई गोवा महामार्गाचे काम गेले अनेक वर्षांपासून चालू असून ते अद्याप पूर्ण झालेले नाही. सरकारचा निष्काळजीपणा रस्त्याची फार झालेली आहे. यामुळे मुंबई गोवा- महामार्गावर अनेक मोठ- मोठे अपघात होत आहेत. यामध्ये निष्पाप लोकांचे बळी जात आहेत. कोकण विभागातील लोकांना न्याय मिळाला पाहिजे. कोकणावर खर्याअर्थाने अन्याय केला जातो. मोठया प्रमाणात होत असेलेले अपघात थांबवेत या करीता सरकारने लवकरच ठोस पाऊले उचलून मुंबई गोवा हायवेचे काम पूर्ण करावे, याकरता मुंबई महामार्ग जनअक्रोश समिती रायगड(नियो.) काम करत आहे. मोठयाप्रमाणात जनआक्रोश आंदोलन सरकार विरोधात करण्यात येणार आहे.
या करीता कोकणातील जनतेचे सहकार्य करून जनतेच्या मनातला आक्रोश दाखवण्याकरीता ठीक ठिकाणी सही मोहीम मोठ्या प्रमाणात राबवत येत आहे. जनतेचा सरकार विरोधात आक्रोश व्यक्त करण्याकरीता मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समिती रायगड(नियो.) यांना पाठिंबा दर्शवण्याकरीता एकता फाऊंडेशन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष- ॲड. तुषार बिरवाडकर यांच्या नेतृत्वाखाली व एकता फाऊंडेशन संघटनेचे प्रमुख सल्लागार मंगेश पुरारकर यांच्या उपस्थितीत तसेच पत्रकार नितेश पुरारकर, सृतेश गोरेगावकर, सत्यवान बिरवाडकर, दिनेश पुरारकर तसेच एकता फाऊंडेशनचे सर्व सहकारी यांच्या सहकार्यांने पुरार येथे महाशिवरात्री उत्सवाचे औचित्य साधून जनआक्रोश सही मोहीम राबविण्यात आली.
मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश सही मोहीमेत हजारो लोकांनी आपला सहभाग नोंदवला. त्यामध्ये विशेष मान्यवर सुरेश उंडरे, चंद्रकांत शिंदे, बबन गोरीवले, मनोज साबळे, सुरेश शिंदे उपस्थित होते. जनतेने भावना व्यक्त करत असताना म्हटले की, मुंबई गोवा महामार्ग लवकरात लवकर सरकारने पूर्ण करावा व होणारे अपघात व त्यांमध्ये जाणारे बळी थांबवेत. या संबंधित मागणी सरकार दरबारी लवकरात लवकर करावी अशी मागणी असल्याचे सर्व नागरिकांनी यावेळी व्यक्त केली.




0 टिप्पण्या