विमान नगर पुणे येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा

  विमान नगर पुणे येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा

पोलीस प्रवाह न्यूज

पुणे- दि. २१- पुणे येथील विमान नगर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य मिरवणूक, अबजल खान वध, व प्रबोधन कार्यक्रम दि. १९ फेब्रुवारी रोजी जयंती उत्सव साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत अभिनेता विनय भगत  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील मावळे कसे होते व अत्ताच्या काळातील मावळे कसे आहेत असे या कार्यक्रमातखूप छान रित्या सांगितले.

शिवांश कवडे वय ४वर्ष यांने छत्रपती शिवाजी महाराज यांचा उत्कृष्ट असा पोवाडा सादर केला सर्व प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रम खूप उत्साहात साजरा झाला. नागरिकांनचा सुध्दा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याच बरोबर लिंबू चमचा, संगीत खुर्ची व क्रिकेट स्पर्धा चे बक्षिस वितरण दत्तात्रेय दादा खाडे उपाध्यक्ष पुणे शहर, व रविंद्र भाऊ साळेगावकर, शैलेश दादा बडदे सरचिटणीस कला व सांस्कृतिक आघाडी पुणे शहर यांच्या हस्ते करण्यात आले.

विजेता संघ:- ज्युनिअर हिंदुस्थानी क्रिकेट संघ

उपविजेता:- एस.आर.ए बॉईस क्रिकेट संघ

 या कार्यक्रमाचे उद्घाटन ईशा ताई कोळेकर (जैन) महिला प्रदेश अध्यक्ष जैन प्रकोष्ठ, महाराष्ट्र भाजपा, व बॉबी कर्नानी ( विमान नगर महिला कलब) (विशेष सहकार्य) व सारीका ताई सासवडे अध्यक्ष शोध सामाजिक संस्था निवेदिका मधु उद्योजिका यांच्या हस्ते झाले.  यावेळी प्रमुख उपस्थिती शैलेश दादा बडदे सरचिटणीस  कला व सांस्कृतिक आघाडी पुणे शहर भाजपा, अरविंद भाऊ परदेशी (  पतीत पावन संघटना ), हेमंत दादा बोरकर  ( सामाजिक कार्यकर्ते) उपस्थित होते. 

या कार्यक्रमाला विशेष सहकार्यशाम भाऊ नागवि (निवेदक,  गायक), राजु भाऊ कळसे (अभिनेता ), सागर क्षिरसाठ ( अभिनेता), विशाल सुर्यवंशी ( अभिनेता), गंगामाई खंडागळे (सामाजिक कार्यकर्ते), कलावती क्षिरसागर (सामाजिक कार्यकर्ते), सौ. छाया चाफले ( सामाजिक कार्यकर्ते) यांचे लाभले. 

कार्यवाहक म्हणून सचिन भाऊ डेंगळे, नितीन भाऊ केंदळे, सुप्रिया मिरगणे, हर्षदा जाधव, नरेश भाऊ खंदारे, रूतुजा शिंदे, गंगा ताई खंडागळे, आबा केंदळे, इस्माईल शेख, संदिप केंदळे, अजय अढागळे, सुभान शेख, नारायण परदेशी, विशाल गुप्ता, सुधिर ढावरे, सुनिल शिंदे, नागेश यादव, अरबाज बागवान, रोहित गुप्ता, अरबाज शेख, निलेश परदेशी यांनी काम पाहिले. 

या कार्यक्रमाचे आयोजन कु.मंजुताई वाघमारे उपाध्यक्षा महिला आघाडी छ.शिवाजीमहाराज नगर विधानसभा मतदारसंघ भाजपा पुणे यांनी केले होते. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या