अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे रोहा येथे आंदोलन

 अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे रोहा येथे आंदोलन

पोलीस प्रवाह न्यूज

माणगांव-दि. २३- महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जे. एन. यू. मधील वामपंथी गुंडांनी, डाव्या विचासरणीच्या लोकांनी  केलेल्या अवमानाबद्दल अखील भारतीय विद्यार्थी परिषद दक्षिण रायगड  रोहा तालुका शाखेच्या कार्यकर्त्यांनी रोहा येथील  मारुती चौक येथे सायंकाळी ७ वाजता वामपंथी संघटनांच्या विरोधात निषेध व्यक्त केला. यावेळी या लाल माकडांचे करायचे काय?  खाली डोक वरती पाय, शिवराय के सन्मान मे एबीव्हीपी मैदान मे, डाव्या विचासरणीच्या संघटनेचा निषेध असो, छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय, वंदे मातरम्,  अशा घोषणा देत जाहीर निषेध केला. तसेच आंदोलनावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा केलेला अपमान कदापिह सहन केला जाणार नाही असे प्रतिपादन दक्षिण रायगड जिल्हा विद्यार्थी विस्तारक व प्रदेश  सहमंत्री  निरज खुरकुटे यांनी केले.

यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद द.रायगड जिल्हा संयोजक कुणाल आंबले, अभाविप कार्यकर्ते यश पंडित, प्रतीक वाघमारे, अथर्व वखारदार, मनिष यादव, श्रेयस गावडे, यश जंगम, आयुष चाकले व  कोंकण प्रदेश सह मंत्री निरज खुरकुटे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या