मनसे सहकार सेना व शेतकरी सेनेची माणगांव तालुक्यात बैठक संपन्न

 मनसे सहकार सेना व शेतकरी सेनेची माणगांव तालुक्यात बैठक संपन्न

पोलीस प्रवाह न्यूज

माणगांव-दि. २४- महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित मनसे सहकार सेना व शेतकरी सेनेचे पदाधिकारी हे कोकण दौऱ्यावर असताना त्यांनी  दि. २४ फेब्रुवारी रोजी दक्षिण रायगड जिल्ह्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या माणगांव तालुक्याला भेट दिली. प्रमुख पदाधिकारी यांची बैठक  दुपारी २ वाजता माणगांव शहरातील बामणोली रोड येथील खरे मंगल कार्यालय  या ठिकाणी पार व पडली. यावेळी दौऱ्यावर असलेले सहकार सेनेचे व शेतकरी सेनेचे पदाधिकारी यांचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड व चेतन उतेकर व दक्षिण रायगड मनसे विविध पदाधिकारी यांच्याकडून स्वागत करण्यात आले.

या दौऱ्यावर प्रामुख्याने मनसे  सहकार सेना प्रदेशाध्यक्ष दिलिप (बापू)धोत्रे, मनसे सरचिटणीस तथा शेतकरी सेना प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे, सहकार सेना सरचिटणीस विजय जाधव, माजी नगरसेविका बृहन्मुंबई महानगरपालिका अनिषा माजगावकर, सहकार सचिव कौस्तुभ लिमये, सहकार सेना उपाध्यक्ष संजय अडारकर, उपाध्यक्ष संजय धावरे, शेतकरी सेना सचिव अमोल भिसे, शेतकरी सेना उपाध्यक्ष भागवत शिंदे, सहकार सेना उपाध्यक्ष महेश फटकसे, राजेंद्र काळे, माजी नगरसेविका बृहन्मुंबई महानगरपालिका सुजाता पाठक, सहकार सेना उपाध्यक्ष वैभव भोर, शेतकरी सेना उपाध्यक्ष भागवत कांदे यांचा समावेश होता.

जिल्ह्यात पक्षाच्या विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्याला नवऊभारी, नवसंजीवनी, नवी चेतना व प्रोत्साहन देण्यासाठी पक्षाकडून हा कार्यक्रम आखण्यात आल्याचे मनसे नेते दिलीप (बापू) धोत्रे यांनी उपस्थित पत्रकारांशी बोलताना सांगितले. यावेळी मनसे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड यांच्यासमवेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना दक्षिण रायगड उपाध्यक्ष चेतन उतेकर, जिल्हा संपर्क अध्यक्ष दिलीप सांगले, उपाध्यक्ष सुबोध जाधव, माथाडी कामगार सेना जिल्हाध्यक्ष संजय गायकवाड, मनसे तालुकाध्यक्ष प्रतीक रहाटे, चिमण सुखदरे, साईनाथ धुळे, दीपक जाधव व दक्षिण रायगड मधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विविध सेल विविध पदाधिकारी व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या