सूर्यकांत भोजकर यांची पोलीस उपनिरीक्षक पदी बढती.

 सूर्यकांत भोजकर यांची पोलीस उपनिरीक्षक पदी बढती.

पोलीस प्रवाह न्यूज 

माणगांव : दि. २० -  माणगांव पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष हरहुन्नरी व जिगरबाज सहाय्यक फौजदार सुर्यकांत भोजकर यांना पोलीस उपनिरीक्षक पदी बढती मिळाली आहे. पोलीस शिपाई ते पोलीस हवालदार ,पोलीस नाईक, सहाय्यक फौजदार असा सूर्यकांत भोजकर यांचा पोलीस खात्यातील सेवा प्रवास आहे.माणगांव पोलीस ठाण्यातील निजामपूर बिट असेल किंवा संवेदनशील असा मोर्बा बिट असेल याठिकाणी भोजकर यांनी आपले कर्तव्य चोख बजावत.जनसंपर्क देखिल तगडा ठेवला आहे.पोलीस खात्यात सेवा बजावत असताना भोजकर यांनी सामाजिक भान देखील राखले आहे त्याची परतफेड म्हणून सुर्यकांत भोजकर यांना विविध सामाजिक पुरस्कार देखील मिळाले आहेत.

     चोख व निष्पक्ष पोलीस  सेवा सेवा बजावणारे सूर्यकांत भोजकर हे १९९३ साली महाराष्ट्र पोलीस दलामध्ये दाखल झाले.एकूण ३० वर्षाच्या पोलीस खात्यातील सेवेमध्ये भोजकर यांनी रायगड जिल्ह्यातील पेण, मुरुड,श्रीवर्धन, बोर्ली,खालापूर या तालुक्यात निष्कलंक सेवा बजावली आहे.भोजकर यांचे मूळ गावं म्हसळा हद्दीतील गौळवाडी हे आहे.पोलीस खात्यातील उत्तम सेवा पाहता भोजकर यांना माणगांव पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक पदी बढती मिळाली आहे.ही बढती मिळाल्यानंतर रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दूरध्वनीद्वारे तर माणगांव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी स्वतः उपस्थित राहून सूर्यकांत भोजकर यांचे अभिनंदन केले. माणगांव पोलीस ठाणे येथे सूर्यकांत भोजकर यांची पोलीस उपनिरीक्षक पदी बढती मिळाल्यानंतर म्हसळा तालुका व माणगांव तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून भोजकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव व कौतुक होत आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या