माणगांव तालुका शिवसेना युवासेना उपतालुका प्रमुख पदी स्वप्निल शिर्के यांची निवड
आ. भरत गोगावले यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान
पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव-दि. १९- माणगांव तालुक्यातील तरुण तडफदार नेतृत्व स्वप्निल शिर्के यांना माणगांव शिवसेना युवासेना प्रमुखपदी दि. १८ फेब्रुवारी रोजी निवड करण्यात आली. शिवसेनेचे उपनेते, विधिमंडळ पक्ष प्रतोद, महाड, पोलादपूर, माणगांव विधानसभेचे कार्यसम्राट आ.भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, शिवसेना नेते ऍड. राजीवजी साबळे , माणगांव तालुका प्रमुख ऍड. महेंद्र मानकर, रायगड जिल्हा युवा सेना प्रमुख विपुल उभारे, उपतालुका प्रमुख नितीन पवार, माणगांव शहर अध्यक्ष सुनिल पवार निजामपूर शहर अध्यक्ष गणेश पवार, पवन कोळवणकर व शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.यावेळी आ. भरत गोगावले यांनी तालुक्यात युवा संघटन कसे वाढेल याकडे जास्त लक्ष केंद्रित करून पक्ष वाढवण्याचे कार्य स्वप्निल शिर्के यांनी करावे. तसेच स्वप्निल शिर्के यांनी प्रसार माध्यमाजवळ बोलताना सांगितले की, मला पक्षानी दिलेली जबाबदारी स्विकारून पक्ष वाढीसाठी व तरुणांच्या समस्या सोडविण्यासाठी काम करेन. तसेच तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी यांच्याकडे समन्वय साधून युवा संघटन कसे वाढेल याकडे लक्ष देऊन काम करीत राहणार असून माणगांव तालुक्यातील तरुणांचे समस्या सोडवून त्यांचे संघटन करणार. स्वप्निल शिर्के यांची युवासेना उपतालुका प्रमुख पदी निवड झाल्याने अनेक मान्यवर व हितचिंतक यांनी प्रत्यक्ष भेटून व सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



0 टिप्पण्या