निजामपूर येथे संत रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी
निजामपूर-दि. ६- माणगांव तालुक्यातील निजामपूर येथील श्री संत रोहिदास नगर येथे दि. ५ फेब्रुवारी रोजी सालाबादप्रमाणे या ही वर्षी श्री संत रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
या जयंतीनिमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन ग्रामस्थ व मुंबईकर यांच्या वतीने करण्यात आले होते. संत रोहिदास नगर ते सोमजाई मंदिर व संपूर्ण निजामपूर शहरातून पालखी नेण्यात आले. हे या पालखीचे तिसरे वर्ष असून मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली.
या पालखी सोहळ्यासाठी अरुण सायगावकर, प्रकाश खामकर, गणेश निजापकर, राजन निजापकर, संतोष निजापकर, महेश चांदोरकर, आतिष निजामपूरकर, संतोष निजामपूरकर, गणेश खामगावकर, अशोक निजापकर, मालेश चांदोरकर, निलेश निजामपूरकर, विनायक निजापकर, रोहित निजामपूरकर, प्रतीक शिंदे, रोहिदास नगर रहिवाशी, निजामपूर ग्रामस्थ, महिला मंडळ यांनी विशेष मेहनत घेतली होती.




0 टिप्पण्या