माणगांव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या सतर्कतेमुळे वाचली अमित कॉम्प्लेक्सची जळती कार पार्किंग.

 माणगांव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या सतर्कतेमुळे वाचली अमित कॉम्प्लेक्सची जळती कार पार्किंग.

पोलीस प्रवाह न्यूज 

माणगांव : दि. ४ - माणगांव शहराच्या एका टोकाला म्हणजेच जवळपास माणगांव नगरपंचायत हद्दीच्या अर्धा ते एक किलोमीटर अंतरावर अमित कॉम्प्लेक्स ही सदनिका धारकांची वसाहत आहे. या अमित कॉम्प्लेक्स मध्ये दुसऱ्या गेटच्या समोरून मागच्या बाजूच्या रिकाम्या प्लॉट मध्ये रात्री १२:३० च्या सुमारास आग लागली असल्याची माहिती माणगांव पोलीस प्रवाहचे पत्रकार प्रमोद जाधव यांना स्थानिक नागरीकांनी दिली. प्रमोद जाधव घटनास्थळी दाखल झाले व तिथूनच त्यांनी माणगांव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांना सदर घटनेची माहीती दिली. तसेच त्यावर न थांबता त्यांनी माणगांव नगरपंचायतचे जेष्ठ कर्मचारी मंगेश पाटील यांना देखील संपर्क साधला व माणगांव नगरपंचायत च्या QRT VAN ची मागणी केली.


 पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक मिलिंद खिरिट व पो. शि. शाम शिंदे देखील घटनास्थळी दाखल झाले. माणगांव नगरपंचायत मध्ये नव्याने दाखल झालेली QRT Van आणि चालक दशरथ गावडे, रामदास आणि प्रकाश मोरे देखील घटनास्थळी दाखल झाले. व त्यांनी QRT van च्या मदतीने अमित कॉम्प्लेक्स येथे लागलेली आग आटोक्यात आणली. माणगांव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी कर्तव्यदक्षता दाखविली नसती तर अमित कॉम्प्लेक्सच्या दुसऱ्या गेटच्या लाईन लगत असलेली कार पार्किंग व उभ्या असलेल्या गाड्या जळून खाक झाल्या असत्या. यामध्ये माणगांव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील व माणगांव नगरपंचायत ची QRT van टीम यांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे माणगांव शहरातील अमित कॉम्प्लेक्स येथे होणारा एक मोठा अनर्थ टळला. याबद्दल माणगांव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील व माणगांव नगरपंचायत QRT van टीमचे माणगांव तालुका व शहरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या