उमरोली येथे शिवजयंती उत्सव धुमधडाक्यात साजरा

 उमरोली येथे शिवजयंती उत्सव धुमधडाक्यात साजरा

पोलीस प्रवाह न्यूज

माणगांव-दि.१९- अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत युगपुरूष छत्रपती शिवरायांचा जयंती उत्सव माणगांव तालुक्यातील उमरोली तर्फे खरवली येथे धुमधडाक्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 

सुरुवातीला सकाळी ८ वा. किल्ले रायगडवरून ज्योत वाजतगाजत मौजे उमरोली गावात आणण्यात आली. मोठ्या उत्साहात उमरोलीकरांनी शिवज्योतचे स्वागत केले. विशेष म्हणजे शिवज्योत आणण्यासाठी मुलींची उपस्थिती लक्षणीय होती. ढोल ताशाच्या गजरात, लेझीमच्या ठेक्यात संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली. सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ उमरोलीकडून शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी हे ३ रे वर्ष असून मिरवणुकी नंतर सत्यनारायण पूजेचे देखील आयोजन करण्यात आले होते. यावेळी सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ, ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या