पन्हळघर बुद्रुक येथे शिवजयंतीउत्सव धुमधडाक्यात साजरा

 पन्हळघर बुद्रुक येथे शिवजयंतीउत्सव  धुमधडाक्यात साजरा

पोलीस प्रवाह न्यूज

माणगांव-दि.१९- माणगाव तालुक्यातील लोणेरे जवळपास चार किलोमीटर अंतरावर असलेल्या पन्हळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या पन्हळघर बुद्रुक येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात ढोल ताशा सनईच्या गजरात धुमधडाक्यात पन्हळघर बुद्रुक येथे साजरा करण्यात आला.

सुरुवातीला सकाळी सात वाजता पन्हळगडावरुन ज्योत वाजतगाजत पन्हळघर बुद्रुक गावात ज्योतीच मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. नंतर  ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची सरपंच संतोष वातेरे यांच्या शुभ हस्ते  पुजा करुन पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर ज्योत गावात  श्री काळभैरव मंदिरात पुजा करून ज्योत गावात मोठ्या उत्साहात गावातून मिरवणूक काढण्यात आली.  भक्तीमय वातावरणात अभिषेक करून पूजा करण्यात आली. 

यावेळी ग्रामपंचायत सरपंच संतोष वातेरे, माजी उपसरपंच राम भोस्तेकर, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद नवाळे, संतोष मेरुकर, बबन शिंदे, राघो शिगवण, रुपेश भोस्तेकर, मनोज वातेरे, लक्ष्मण नवाले, तुकाराम वातेरे,  मधुकर नवाळे, टिकम वातेरे, सिताराम वातेरे,सखाराम भोस्तेकर, पयानंद  वातेरे, जनार्दन नवाळे, तसेच गावातील ग्रामस्थ मंडळ पन्हळघर बुद्रुक मुंबईकर मंडळ, पन्हळघर बुद्रुक महिला मंडळ, तसेच पन्हळघर बुद्रुक तरुण मंडळ,व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहून मिरवणूक उत्साहात सहभागी झाले होते. शेवटी काळभैरव मंदिरात कार्यक्रमाची सांगता झाली.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या