अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात महाराष्ट्र पोलीस दल दुसऱ्या क्रमांकावर
६६ वा अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा हा दिनांक १३ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी रोजी भोपाळ, मध्यप्रदेश येथे संपन्न झाला असुन त्यामध्ये संपुर्ण देशातुन एकुण २४ राज्याच्या संघानी सहभाग नोंदविला होता. महाराष्ट्र राज्य पोलीस दलाच्या वतीने ३२ पोलीस अधिकार/ अंमलदार, ७ श्वान व १२ श्वान प्रशिक्षक सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्य संघाने ११ पदकांसह अँन्टी सबोटेज चेक विनर्स ट्रॉफी व सायंटिफीक एड टू इन्वेस्टीगेशनची रनरअप ट्रॉफी मिळवून महाराष्ट्र पोलीस दलासाठी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. सदर बक्षिस वितरण सोहळा मध्यप्रदेश भोपाळ येथे राज्यपाल श्री मंगुभाई पटेल यांच्या शुभ हस्ते पार पडला. सदर मेळाव्यात तामिळनाडु राज्याला जनरल चॅम्पीयनशीप मिळाली असुन महाराष्ट्र राज्य पोलीस संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे.
पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे व्यावसायिक नैपुण्य व कौशल्य वाढविण्यासाठी अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्याचे धर्तीवर सन २००२ पासून महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्याचे आयोजन केले जाते. सदर मेळाव्यामध्ये १) सायंटिफिक एड टु इन्वेस्टीगेशन ( विज्ञान शास्त्राची तपासास मदत ) २) घातपात विरोधी तपासणी स्पर्धा ३) संगणक स्पर्धा ४) पोलीस फोटोग्राफी ५) पोलीस व्हिडिओग्राफी ६) श्वान स्पर्धा इत्यादी विषयांच्या स्पर्धा घेवून त्यामधील पदक प्राप्त विजेत्या स्पर्धकांचे दिनांक २३ जानेवारी पासून ते दिनांक १० फेब्रुवारी पर्यंत विशेष प्रशिक्षण व सराव शिबीर हे गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे मार्फत महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी, रामटेकडी पुणे येथे आयोजित करण्यात आले होते. प्रशिक्षणा दरम्यान घेण्यात आलेल्या निवड चाचणीच्या आधारे अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्या करिता महाराष्ट्र राज्य पोलीस दलाच्या संघाची निवड करण्यात आली. ६६ व्या पोलीस कर्तव्य मेळाव्यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या पोलीस संघाने खालीलप्रमाणे एकुण १ सुवर्णपदक, ४ रजत पदके व ६ कांस्यपदके असे एकुण ११ पदके व १ विनर ट्रॉफी व १ रनरअप ट्रॉफी मिळवून विशेष कामगिरी केली आहे.
१) सायंटिफिक एड टु इन्वेस्टीगेशन या स्पर्धेमधील उप स्पर्धा प्रकार
1) Observation Test यामध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील स्पर्धकांना २ पदके प्राप्त झाली - असून त्यामध्ये श्री. प्रदीप लहुडकर, पो. हवा. नेमणूक- अमरावती ग्रामीण यांना रजत पदक व श्री सतीश स्वामी पो. हवा, नेमणूक सोलापुर शहर यांना कांस्यपदक प्राप्त झाले आहे. (11) Police Potrate पोलीस पोट्रेट यामध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील स्पर्धक श्री. रविंद्र बहुले, पो. शि. नेमणूक- औरंगाबाद शहर यांना कांस्यपदक प्राप्त झाले आहे.
Written test on criminal law crime investigation rules and procedures
यामध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील स्पर्धक श्रीमती अर्चना पाटील, पोलीस उप अधिक्षक, नेमणूक- राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे यांना कांस्यपदक प्राप्त झाले आहे.. IV) Forensic Science - यामध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील स्पर्धकांना २ पदक प्राप्त झाले असून त्यामध्ये श्री. मच्छिंद्र खाडे, पोलीस निरीक्षक, नेमणूक- अहमदनगर व श्री लक्ष्मण बोरा, सपोनि, नेमणूक- ठाणे शहर यांना रजत पदक मिळाले असून सायंटिफिक एड टु इन्वेस्टीगेशन या स्पर्धेमध्ये रनरअप ट्रॉफी मिळाली आहे. यात पोनि निता मिसाळ, सपोनि अन्वर मुजावर, सपोनि राजेश खोपकर यांचा वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेसोबत मोलाचा वाटा आहे.
२) Police Photography यामध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील स्पर्धक श्री. राजेंद्र सावंत, पो.ना. नेमणूक एसआरपीएफ ग्रुप २ यांना कांस्यपदक प्राप्त झाले आहे. ३) Anti sabotage check या स्पर्धेमधील उप स्पर्धा प्रकार
1) Car Search - यामध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील स्पर्धकांना २ पदक प्राप्त झाले असून त्यामध्ये श्री. एस. व्ही. गवस, पो. उप निरीक्षक नेमणूक- एसआरपीएफ ग्रुप-८ यांचा प्रथम क्रमांक आला असून त्यांना सुवर्णपदक व श्री शशिकांत गाडेकर, पो. हवा. नेमणूक- एमआयए पुणे यांना रजत पदक प्राप्त झाले आहे.
II) Ground Search - त्यामध्ये श्री. प्रविण डोरजे, पो. हवा. नेमणूक पिंपरी चिंचवड, पुणे Acess Control - यामध्ये श्री. रमेश कुथे, पो.हवा, नेमणूक रायगड यांना कांस्यपदक प्राप्त झाले आहे.
यांना कांस्यपदक प्राप्त झाले आहे.
महाराष्ट्र पोलीस संघाच्या या भरघोस यशाबद्दल, मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई श्री. रजनिश सेट, मा. अपर पोलीस महासंचालक, गु. अ. वि. महाराष्ट्र राज्य, पुणे, श्री. प्रशांत बुरडे यांनी अभिनंदन केले असून, विशेष पोलीस महानिरीक्षक, श्री सुरेश मेखला व श्री सुधीर हिरेमठ यांनी विजेते व त्यांच्या प्रशिक्षकांचे कौतुक केले आहे. तसेच पोलीस अधिक्षक श्री पंकज देशमुख, श्री दिनेश बारी, " श्री अरविंद चावरीया, व श्रीमती नंदा पाराजे यांनी स्पर्धकांच्या प्रशिक्षणाकडे विशेष लक्ष दिले. टिम मॅनेजर म्हणून पोलीस अधीक्षक श्रीमती पल्लवी बर्गे (कायदा व संशोधन) व अस्टिटंट टिम मॅनेजर म्हणून अपर पोलीस अधीक्षक, राजेंद्र कुंटे (रागुअके), पोलीस उप अधीक्षक, श्रीमती संगिता जाधव (विशेष शाखा) यांनी आणि पोनि गिरीषा निंबाळकर, अॅन्टी सबोटेजचे संतोष जाधव, प्रशांत मांडके, श्वान पथकाचे प्रदिप जाधव, एस. टी. माने, फोटोग्राफर जे. के. तळपे, पी.के.खंडाळे, एस.डी.माने, तसेच सायंटीफीक एड टु इन्वेस्टीगेशनचे पोनि /पी. आर. कानकाटे, पोनि प्रताप कुंभार, संगणक विभागाचे पोनि गणेश धामणे व हरिभाऊ काशिद, मोहन माळी, संदीप शिंदे, सुवर्णा साळुंके यांनी विशेष परिश्रम घेतले आहे. तसेच महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता प्रबोधिनी व राज्य राखीव पोलीस बल गट क्र.१ व २. रामटेकडी. पुणे येथील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मोलाचे सहकार्य केले आहे.



0 टिप्पण्या