माणगाव खांदाड येथे अखंड हरिनाम सप्ताह व महाशिवरात्री उत्साहात साजरी.

माणगाव खांदाड येथे अखंड हरिनाम सप्ताह व महाशिवरात्री उत्साहात साजरी.

पोलीस प्रवाह न्यूज 

माणगाव : दि. १९ -  माणगाव खांदाड येथे दरवर्षी प्रमाणे या ४२ वर्ष वे  दिनांक १४ ते १९ फेब्रुवारी अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी ग्रंथाचे सामुदायिक पारायण चे आयोजन माणगाव सोनभैरव मंदिर खांदाड येथे ग्रामस्थ मंडळ खांदाड व समस्त सद्गुरु सेवा परिवार यांनी केले होते. परमपूज्य श्री. सद्गुरू शंकर दगडे महाराज, आंदोरी जि.सातारा व परमपूज्य सद्गुरू श्री.पांडुरंग सुतार महाराज, व गुरुमाता सूनिती पांडुरंग सुतार महाड यांच्या कृपा आशीर्वादाने श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाचे सामुदायिक पारायण आयोजित केले होते.

तसेच पारायणाचा शुभारंभ व कलश पूजन, विणा पुजन गुरुवर्य श्री.आजीव पांडुरंग सुतार यांच्या शुभहस्ते माघ कृ ८ दिनांक १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वा. करण्यात आले व  दैनंदिन कार्यक्रम सकाळी ५ वा. काकड आरती,तसेच सकाळी ८ ते १२ व दुपारी ३ ते ५ वा. श्री. ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पारायण,  सायंकाळी ५ ते ७ प्रवचन तसेच सायंकाळी ७ ते ८ हरिपाठ, व रात्री ९ ते ११ किर्तन तसेच रात्री १२ ते ५ हरीजागार तसेच दिनांक १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता श्री ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता. श्री सद्गुरू सेवा मंडळ माणगाव यांच्या शुभहस्ते. व दि.१९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वा. दिंडी सोहळा सोनभैराव मंदिर ते खांदाड असे फिरवण्यात आली या दिंडीस नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार,दत्तात्रेय शिंदे,अशोक माने, भाऊ पांडे, कनोजे आण्णा, किरण जाधव , मारुती पवार, सचिन कुलकर्णी, पांडुरंग पवार, पांडुरंग सुतार, आप्पा गायकवाड, शरद सुतार,राम पोवार, संतोष माने, पोलीस पाटील नथुराम पोवार, काशिराम पोवार, अनंता पोवार, दत्तात्रेय जाधव, संतोष मोरे, नथुराम गुगले, विजय उकिरडे तसेच लहान बालके व महिला मंडळ  मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच नंतर ह.भ. प श्री. टोगळे महाराज, खांब यांचे कीर्तन झाले. नंतर १ ते ३ महाप्रसाद करण्यात आले. या सप्त्यास ६ दिवस लोकांकडून वाढता उत्साह निर्माण झाला होता व भक्ती भावनेत हा सप्ताह पार पडला या कार्यक्रमास ग्रामस्थ मंडळ खांदाड व समस्त सद्गुरू सेवा परिवार यांनी चांगल्या प्रकारे मेहेनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी पार पडला.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या