कळमजेत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी
शिवज्योतीचे पंकज तांबेकडून भव्य स्वागत, महिला, पुरुष, तरुणांची लक्षणिय उपस्थिती
पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव-दि.- १९- दरवर्षी प्रमाणे यंदाचे वर्षी माणगांव तालुक्यातील कळमजे येथील शिवगर्जना मित्र मंडळाने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दि. १९ फेब्रुवारी रोजी रविवारी मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांची रायगड किल्ले या राजधानीतून पहाटे ५ वा. शिवरायांच्या समाधीस्थळापासून शिवज्योत घेऊन तरुण मावळे यांनी माणगांवच्या दिशेने पाऊल टाकले. सकाळी १० वा. रायगड जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष पंकज तांबे यांच्या हस्ते विभारज कॉट्टेज निवासस्थानी या शिवज्योतीचे पूजन करून पुष्पमाला अर्पण करीत भव्य स्वागत करण्यात आले.
त्यानंतर सर्व तरुण कलमजे गावातून छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य मिरवणूक काढून लेझिम, फटाके व गुलालाची उधळण करीत भगवी पतका खांद्यावर घेत पारंपरिक वेशभूषा करून पुरुष, महिला व तरुण मुला, मुलींनी लेझिम, खाळूबाजा व सनई यांच्या तालावर ठेका धरित छत्रपती शिवरायांच्या जयघोशांनी परिसर दणाणून सोडला. त्यामुळे या मिरवणुकीत जोशपूर्ण रंग भरला गेला.
कळमजे येथील शिवगर्जना मित्रमंडळचे हे दहावे वर्ष असून आपल्या गावातील छत्रपती शिवाजी महाराज यांची शिव जयंती साजरी करण्यासाठी मुंबई येथील नागरिक व तरुण शिव जयंती मध्ये उत्साहात सहभागी झाले. स्वतः पंकज तांबे यांनी शिवजयंतीत सहभागी होऊन मार्गदर्शन करीत जोश वाढविला. यावेळी तरुणांनी चौका चौकात व मुख्य रस्त्यावर लेझिम व लाठी काठी फिरवून मिरवणुकीत अधिकच जोश वाढविला. यावेळी शिवज्योत कळमजे गावातील श्री काळभैरव मंदिराच्या प्रांगणात शिवज्योतीचे पूजन करून स्थापना करण्यात आली. पंकज तांबे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सकाळी ११ ते १ भव्य दिव्य मिरवणूक आणि शिवपूजन, साय. ४ वाजता सत्यनारायणाची महापूजा, सायंकाळी ६ ते ७ वा. हरिपाठ, रात्रो ७ ते ९ वा. महाप्रसाद, भोजन, रात्रो १० वा. भजन असे कार्यक्रम शिवजयंती निमित्त आयोजित आले होते.
या शिवजयंतीचे आयोजन शिवगर्जना मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते यांनी केले होते. या वेळी मुकुंद वाढवल, अमोल वाढवल, नंदूराज वाढवल, मोहन वाढवल, राहुल राऊत, सुशांत पडवळ, महेंद्र वाढवल, राजेश वाढवल, नयन वाढवल, सुरज वाढवल. तुषार वाढवल, तेजस वाढवल, तनय वाढवल, अजिंक्य खाडे, बच्चू वाढवल, तुकाराम वाढवल, नथुराम वाढवल, युवराज वाढवल, अमीर वाढवल, मनोज वाढवल, भावेश वाढवल, विशाल वाढवल, विजय वाढवल, श्रावणी वाढवल, रोहिणी वाढवल, सावरी वाढवल, सिद्धी वाढवल, समीरा वाढवल, सुजित वाढवल, ज्ञानेश्वर वाढवल, संदेश वाढवल, निखिल वाढवल यांच्या सह अनेक महिला, पुरुष यांचा सहभाग होता.




0 टिप्पण्या