कुणबी सेवा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने समाज ओळख मेळावा व हळदिकुंकू आणि सांस्कृतिक कार्यक्रम समारंभ संपन्न

 कुणबी सेवा चॅरिटेबल ट्रस्ट  यांच्या वतीने  समाज ओळख मेळावा व हळदिकुंकू आणि सांस्कृतिक कार्यक्रम समारंभ संपन्न 

पोलीस प्रवाह न्यूज

मुंबई-दि.३-कुणबी सेवा चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई (गोरेगांव-लोणेरे-माणगांव) रायगड यांच्या माध्यमातून यावर्षीही सेवा भारती हॉल माटुंगा मुंबई येथे ट्रस्ट संस्थापक/अध्यक्ष निलेश सत्वे, उपाध्यक्ष निलेश तळवटकर यांच्या उपस्थितीत व अध्यक्ष प्रकाश मोरे तसेच महीला अध्यक्षा प्रतिभा मोरे यांच्या संयुक्त अध्यक्षतेखाली कुणबी समाज ओळख मेळावा व हळदिकुंकू आणि सांस्कृतिक कार्यक्रम समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला मान्यवरांच्या  हास्ते दीपप्रज्वलन करुन समाज त्रीमुर्तींना व छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्प अर्पण करण्यात आले. तसेच उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. सदर कार्यक्रमाला महिलांनी सहकुटूंब सौभाग्याचे वाण लुटले. तर छोट्या मुलांनी नृत्यकला सादर करुन उपस्थितीतांची मन जिंकली. एक विशेष म्हणजे पारंपारिक वारसा जपणारी लाठीकाठी उत्तम प्रदर्शन छोट्या ५ वर्षाच्या अथर्व समीर गवसकर यांनी प्रदर्शन केले तर प्रत्येक नाटक, नृत्य सादर करणार्या विद्यार्थी विद्यार्थीनी चे प्रसिस्थिपत्रक देऊन मान्यवरांचा हास्ते गौरविण्यात आले.


या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कुणबी समाजोन्नती संघचे अध्यक्ष  भुषण बरे, रा. जि. स. समितीचे अध्यक्ष उदय कटे, पोलिस पाटील चंद्रकांत चेरफळे, बाविसवि विभाग मुंबई अध्यक्ष चंद्रकांत सावंत, उपाध्यक्ष  जानू डोंगरे, राजू पालकर, विजय भोस्तेकर, पत्रकार तथा माजी पन्हळघर बु. उपसरपंच राम भोस्तेकर,  चिंचवलि माजी सरपंच श्रुती नरेश काळेकर, मढेगाव सरपंच विनायक काळप, पन्हळघर बु. सरपंच संतोष वातेरे, गजानन पाटील, प्रदिप मोगरे, नितीन चालके, महेश गोटल ,नरेश काळेकर, तळा चे देवाजी काप तळा, चेतन मोरे, बावस्कर गुहागर उपस्थित होते.


रायगड जिल्हा माणगांव तालुक्यातील  प्रत्येक ठिकाणी कायम वर्चस्व कुणबी समाजबांधव असेल पाहिजे  जिल्ह्यातील सर्वसामान्य हजारो महिला नागरिकांना व शेतकरी, कष्टकरी, वंचित उपेक्षितांना तळमळीने न्याय देण्याचे व त्यांचा सर्वांगीण विकास करण्यारे  सरपंच, उपसरपंच वेगवेगळ्या समिती अध्यक्ष सदस्य नगरसेवक असे अनेक लोकप्रतिनिधी हे समाजबांधव असेल तर  आमदार खासदार यांच्या मार्गदर्शनाखाली आपले प्रश्न विधानसभेत लोकसभेत मांडणारे आपल्या हक्काचं प्रतिनिधी हवा. त्यासाठी आपण सर्व कुणबी बांधव एकत्र येणे काळाची गरज आहे असे मार्गदर्शन अध्यक्ष भुषण बरे यांनी समाजबांवाना केले. तर  उल्लेखनीय, कौतुकास्पद कार्य पार पाडत आहेत, असे गौरोद्गार काढून कुणबी चॅरिटेबल ट्रस्टचे निलेश सत्वे आणि टिमचे भरभरून कौतुक केले. तर समाजबांधवांना  पोलीस पाटील चंद्रकांत चेरफळे यांनी मोळाचे मार्गदर्शन केले. ट्रस्ट अध्यक्ष प्रतिभा मोरे, संस्थापक निलेश सत्वे यांनी समाजप्रबोधनाचे उत्तर प्रकरे मांडणी करुन प्रस्तावना केली तर समाजबांधव वेगवेगळ्या क्षेत्रात समाजाला मदत करणाऱ्या सर्व समाजबांधवांचे यथोचित शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांचा सत्कार स्वागत करण्यात आले.


कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आभार प्रदर्शन अध्यक्ष प्रकाश विठ्ठल मोरे, उपाध्यक्ष निलेश तळवटकर सचिव नितिन कासरेकर, आणि पंकज पालकर यांनी केले. सुरवाती पासून शेवट पर्यंत यशस्वी करण्यासाठी नितीन मोरे, संतोष आवाद, संदीप ढेपे, समिर गवसकर , शिरिष भोसले, सखाराम आवाद, मधुकर मोरे, विठ्ठल लाखाडे, महेंद्र वाघोस्कर, महेश महादे,  दिलिप मोरे, विदेश चेरफळे, विकास करकरे, राकेश शिंदे, नामदेव भोस्तेकर, दिलिप गवसकर, नितीन शिंदे, अशोक पालकर, मनोज वातेरे , परेश शिंदे, राजू धोंडगे,चंद्रकांत शिंदे, सुभाष तेटगुरे, केशव निंबरे  जितेंद्र मोरे, निलेश सत्वे, सुनील सत्वे, नारायण शिंदे, ज्ञानेश्वर मोरे, शैलेश पालकर, संदेश जुमारे,शेखर पेंढारी, किरण शिंदे, सुनील पालकर, सचिन पालकर, मिथुन पालकर, मंगेश वाळगुडे, नितेश खांडेकर खेड, सुधाकर इंगळे ढेरवन रत्नागिरी, नरेश पाटील पालघर, संतोष मोरे, देवेंद्र तळवटकर, रवींद्र माने, सूर्यकांत कासरेकर, प्रवीण खराडे, प्रकाश वाडेकर, बाळाराम पेंढारी, विनायक शिंदे, राजेश शिर्के, अनंत धसाडे, दिलीप बरे, अभिजित शिंदे, सूर्यकांत मोरे मनीष लांबे यांचे योगदान मोलाचे ठरले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या