कामेरकर हॉस्पिटलमध्ये महिलांसाठी मोफत आरोग्य शिबीर
माणगांव-दि.२- कामेरकर हॉस्पिटल ऑर्चिड फर्टिलिटी क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. ५ फेब्रुवारी रोजी १२ वर्षावरील मुली व महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
आरोग्य शिबीर कामेरकर हॉस्पिटल, बामणोली रोड येथे सकाळी १० वा ते ४ वा. दरम्यान होणार आहे. आरोग्य शिबिरासाठी कामेरकर हॉस्पिटल, सिद्धिविनायक मेडिकल बामणोली रोड, डॉ. मृणाल वाढवळ, डॉ. अमित मेथा इंदापूर, डॉ. आदेश घोणे इंदापूर, डॉ. अभिजित पाटसकर, डॉ. अरबीना राहटविलकर साई येथे नावे नोंदविण्यात येणार आहेत. कामेरकर हॉस्पिटल व ऑर्चिड फर्टिलिटी क्लिनिक तर्फे वंध्यत्व, अंडाशय व गर्भनलिकेच्या गाठी, पीसीओडी, नसबंदी शस्त्रक्रिया, पाळीचा त्रास, स्तनांच्या गाठी, गर्भपिशवी गाठी, कर्करोग तपासणी ई आजारांवर व सर्व प्रकारच्या टाक्याच्या व दुर्बिणीच्या शस्त्रक्रिया व ऍडव्हान्स उपचार माफक दरात केले जातात. या आरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. संतोष कामेरकर यांनी केले आहे.



0 टिप्पण्या