दुर्गवीर प्रतिष्ठान मुंबई संस्थेतर्फे कडापे आणि कशेणे शाळांना संगणक संच भेट
पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव-दि. २५- किल्ले मानगड, कुर्डूगड या माणगाव तालुक्यातील किल्ल्यांसोबत महाराष्ट्रातील अनेक गडांवर संवर्धन कार्य करत असलेल्या दुर्गवीर प्रतिष्ठान या संस्थेने रायगड जिल्हा परिषद शाळा कशेणे आणि कडापे यांना मोफत संगणक संच संस्थापक अध्यक्ष संतोष हसुरकर यांच्या हस्ते देण्यात आला.
छत्रपती शिवाजीमहाराजांनी बांधलेल्या गडकिल्ल्यांची सध्याची बिकट अवस्था पाहून गेली पंधरा वर्षांपासून दुर्गवीर प्रतिष्ठान सातत्याने मानगड, कुर्डूगड, सूरगड, मृगगड या रायगड जिल्ह्यातील किल्ल्यावर संवर्धनाचे कार्य करत आहे. यासोबतच गडाच्या परिसरातील शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य, गणवेश, आदिवासीपाड्यांमध्ये सौर दिवे, कपडे, आरोग्यसुविधा यातही अग्रेसर आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या कशेणे आणि कडापे शाळांमधील संगणकाची गरज ओळखून, दुर्गवीर प्रतिष्ठानने प्रत्येकी एक संच भेटस्वरूपात दिला.
याप्रसंगी दुर्गवीर प्रतिष्ठान अध्यक्ष संतोष हसुरकर, सल्लागार रामजी कदम, प्रशांत डिंगणकर, भूषण पाटील, प्रमोद डोंगरे, महेश सावंत, शाळा समिती अध्यक्ष सायगावकर, मुख्याध्यापिका अपूर्वा जंगम तसेच कडापे शाळेत अध्यक्ष जनार्दन सिलीमकर, मुख्याध्यापिका पडवळ, उपक्रमशील शिक्षक सखाराम कदम उपस्थित होते.





0 टिप्पण्या