माणगांव तालुक्यातुन अल्पवयीन मुलीचे अपहरण

 माणगांव तालुक्यातुन अल्पवयीन मुलीचे अपहरण

पोलीस प्रवाह न्यूज

माणगांव-दि.-२- माणगांव तालुक्यातील साई या गावातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना घडली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की,/फिर्यादी  रा. साई यांची मुलगी वय वर्षे १६ हिला दि. २८ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास अपहरीत मुलगी ही घरात एकटीच असताना कोणत्यातरी अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेली आहे.

फिर्यादी यांनी आपल्या नातेवाईकांकडे शोध घेतला असता मिळून आली नाही. सदर अपहरीत मुलीचे वर्णन रंग सावळा, उंची अंदाजे ५ फूट ४ इंच, अंगाने मध्यम, केस काळे व लांब, अंगात नेसुस काळ्या रंगाचा बुरखा, पायात सॅंडल, पायात पांढऱ्या रंगाचे धातूचे पैंजण असे आहे. या घटनेबाबत  माणगांव पोलीस ठाण्यात कॉ. गु. र. नं. १९/२०२३ भा. दं. वि. स. कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास माणगांव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सूर्यकांत भोजकर हे करीत आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या