कु. मयूर विलास यादव यांच्या वाढदिवसानिमित्त जि. प. शाळेत घडयाळ वाटप

 कु. मयूर विलास यादव यांच्या वाढदिवसानिमित्त जि. प. शाळेत घडयाळ वाटप 

पोलिस प्रवाह न्यूज

गोरेगाव-दि.३१- राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते कु.मयूर विलास यादव याच्या वाढदिवसानिमित्त गोरेगाव विभागातील गोरेगाव मुलांची शाळा, गोरेगांव कन्या शाळा, सोन्याची वाडी रा. जि. प शाळा, चिंचवली रा. जि. प शाळा, नागाव रा. जि. प शाळा, भिंताड रा. जि. प. शाळा, मूर रा. जि. प. शाळा, देवळी रा.जि.प शाळा, चिंचवली अंगणवाडी, चिंचवली वाडी अंगणवाडी येथे भिंतीवरचे घड्याळ व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. 

यावेळी उपस्थित ज्येष्ठ समाजसेवक भगत काका तलवटकर, किसन धोंडू यादव, गोरेगाव ग्रामपंचायत उपसरपंच व विद्यमान सदस्य विनोद बागडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गोरेगाव विभागीय उपाध्यक्ष तथा चिंचवली ग्रामपंचायत सदस्य विलास वसंत यादव व राष्ट्रवादी महिला रायगड जिल्हा संघटक सचिव तथा राष्ट्रवादी महिला गोरेगाव विभागीय अध्यक्षा  विशाखा विलास यादव, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मनिज सुतार, युवा कार्यकर्ते कु. मयूर यादव, कु.स्वरूप सावंत, कु. आदित्य चिरफळे, कु.चैतन्य चव्हाण, कु.अवधूत हरकळ  व शाळेचे मुख्याध्यापक  शिक्षक व अंगणवाडी सेविका आदी मान्यवर उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या