उषःकाल फाउंडेशन तर्फे सन्मान सोहळा संपन्न

 उषःकाल फाऊंडेशन तर्फे सन्मान सोहळा संपन्न

पोलीस प्रवाह न्यूज

माणगांव-दि. ९- उषःकाल फाऊंडेशन तर्फे आरोग्य शिक्षण आणि सार्वजनिक सेवा या क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या लोकांचा द्वितीय सन्मान सोहळा दि. ८ जानेवारी रोजी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक वडघर इथे संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन होत्या. कार्यक्रमाला लिंगभाव क्षेत्रात उल्लेखनीय राज्यभर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आरती नाईक, अविष्कार नर्सरीचे प्रमुख संदेश कुलकर्णी, साम टीव्ही पत्रकार सोनाली शिंदे आणि उषःकाल फाऊंडेशन संस्थापक नामदेव शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमात आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक सेवा यात  तळागाळात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या लोकांचा गौरव करण्यात आला. अनेक सन्मानार्थीनी अत्यंत भावपूर्ण मनोगते व्यक्त केली. यातील अनेक सन्मानार्थीनी कार्याचा प्रथमच गौरव केल्याचे आवर्जून नमूद केले.  उषा शिंदे आणि आदिप शिंदे यांच्या कार्याची स्मृती अनेक लोकांनी जागविल्या.

आपल्या भाषणात संदेश कुलकर्णी यांनी उषःकाल फाऊंडेशनने वारक आणि वरसोली या दोन शाळा डिजिटल केल्याचा आवर्जून उल्ल्लेख केला. उल्का महाजन यांनी अध्यक्षीय भाषणात वैयक्तिक प्रेरणांमधून सुरु झालेल्या कार्याचे मूल्य मात्र अभिजात असल्याचा उल्लेख केला. या कार्याला त्यांनी पूर्ण परिसरात अनोखे असल्याचा आवर्जून उल्लेख केला. उषःकाल फाऊंडेशन संस्थापक नामदेव शिंदे यांनी फाऊंडेशनचे कार्य हेच आपल्या उरलेल्या जीवनाची इतिकर्तव्यता आहे याचा उल्लेख केला. या कार्यक्रमासाठी परिसरातील अनेक मान्यवर, वारक ग्रामस्थ, साईनगर पुर्व रहिवासी संघ उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या