माणगांव साईदिंडी पालखीतील मार्गस्थ झालेल्या श्वान जोडीची अद्भुत कथा.
पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव-दि. ९- सर्वधर्म समभावतेची माणगांव तालुक्यातील ओम सिद्धी साईदिंडी कोकण ही दि. १ जानेवारी रोजी माणगांव शहरातील नाणोरे ते श्री क्षेत्र शिर्डी रवाना झाली. सुमारे ३०० कि.मी. चा प्रवास असणाऱ्या या पदयात्रेत २३० साईसेवक मार्गस्थ झाले आहेत. दि. १ जानेवारीला निघालेली ही पदयात्रा दि. १० जानेवारी पर्यंत श्री क्षेत्र साई मध्ये दाखल होते.
मात्र ११ वर्षाची परंपरा असलेल्या या ओम सिद्धी साई दिंडी माणगाव पासून श्री क्षेत्र शिर्डीकडे मार्गक्रमण करत असताना अद्यापपर्यंत अनेक साईभक्तांना अनेक दैवी चमत्कार दिसून आले आहेत. त्यापैकी एक म्हणजे या पदयात्रेत श्वानांची हजेरी साईसेवकांप्रमाणे पदयात्रेत दाखल होणे. आणि अगदी १५० ते १३० किमी चा प्रवास साईपालखीसोबत करणे हे दरवर्षी घडत असते. एखादं दुसरा श्वान या पदयात्रेत सामील होतो आणि माणगाव तालुक्यातील ताम्हिणी घाट सोडल्यानंतर पौड ते अगदी संगमनेर ते मंचर पर्यंत हे श्वान जेथे साईसेवक पालखीसह विसावा घेतात. त्या ठिकाणी थांबतात व पुन्हा साईपालखी मार्गस्थ झाल्यानंतर मार्गक्रमण करतात. मात्र मंचर पर्यंत मार्गक्रमण करून हे श्वान गायब होत असतात.
असाच प्रकार या वर्षीच्या ओम सिद्धी साईदिंडी कोकण च्या पदयात्रेत आहे. या पदयात्रेने पुणे सोडल्यानंतर हिंजवडी राजगुरूनगर पासून ह्या पदयात्रेत एक श्वानांची नर-मादी जोडी सामील झाली आहे. आणि या दोन्ही श्वानांचा साईपालखी पडयात्रेत सुमारे १३० किमी पेक्षा जास्त प्रवास झाला आहे.असे चमत्कार नेहमीच साईंच्या कृपेने साईबाबा आपल्या भक्तांना त्यांच्या भक्तीतून दाखवत असतात असे मत साईचरणरज समाधान महाराज उतेकर आणि ओम सिद्धी साईदिंडी कोकण पालखी सोहळा अध्यक्ष संतोष खडतर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आहे.



0 टिप्पण्या