ओमकार भजनी मंडळाची वार्षिक सत्यनारायणाची पुजा उत्साहात संपन्न.
पोलीस प्रवाह न्यूज
माणगाव : दि.८ - ओमकार भजनी मंडळ खांदाड या मंडळाची १९४५ साली स्थापना करण्यात आली . गेली ७७ वर्ष ह्या मंडळाने विविध कार्यक्रम व उपक्रम राबऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे . या वर्षी देखील सालाबादप्रमाणे श्री सत्यनारायण महापूजेचे अायोजन करण्यात आले. असून या महापूजेला बसण्याचा मान श्री विशाल घर्वे व . सौ. घर्वे यांना मिळाला. तसेच या वेळी महिलांसाठी हळदी कुंकू, हरिपाठ , सांस्कृतिक कार्यक्रम व मंडळातील कोरोना काळात ज्यांनी चांगले कामे केली आहेत अश्या कोरोना योध्याचा सन्मान देखील या वेळी करण्यात आला. या वेळी आ. भरत गोगावले , नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार, मंडळाचे सदस्य अॅड. राजीवजी साबळे , नितीन बामगुडे यांनी देखील आपली उपस्थिती लावली होती.
गावदेवीच्या व हनुमंता च्या आशीर्वादाने या परमेश्वरांच्या कृपादृष्टिमुळे मंडळ आज ७८ व्या वर्षात पदार्पण केले आहे. शुक्रवार दि .७/१/२०२३ रोजी सत्यनारायण महापूजा उत्साहात संपन्न झाली. यावेळी मंडळाचे जेष्ठ मार्गदर्शक दिपकभाई साबळे, नरेंद्र शेठ गायकवाड, अध्यक्ष - महेंद्र दळवी , उपाध्यक्ष अमित जाधव , सेक्रेटरी- विशाल घर्वे , वैभव साबळे, संजय आण्णा साबळे, दत्तात्रेय शिंदे, गणेश चव्हाण , प्रसाद शिंदे. दिलीप यादव, आबा दळवी, जयराम घरटकर, यशवंत सावंत, विजय यादव, निलेश यादव, मंदार शेलार , अरविंद जाधव , निलेश सुतार , नितीन जाधव, सुहास शिंदे, संपन्न घर्वे, अल्पेश मांजरे , जितेंद्र जाधव , चंद्रकांत पाटील , मधुकर घर्वे, वीरेंद्र घर्वे, विलास शिर्के , कमलेश शेलार, चेतन गायकवाड , संदेश घर्वे, वसंत सावंत ,रणधीर कानोजे, रवींद्र मांजरे, नाना यादव , तात्या मूरुडकर, संतोष खैरे, सुरज सांगले, ओंकार भजनी मंडळाचे सदस्य व महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



0 टिप्पण्या