खा. सुनील तटकरेंच्या विधान मंडळातील भाषणांचा पुस्तक प्रकाशन सोहळा

खा. सुनील तटकरेंच्या विधान मंडळातील भाषणांचा पुस्तक प्रकाशन सोहळा
पोलीस प्रवाह न्यूज 

माणगाव-दि. ६-  रायगड रत्नागिरी लोकसभा खा. सुनील तटकरे यांच्या विधान मंडळातील भाषणांचा पुस्तक प्रकाशन सोहळा दि. ९ जानेवारी रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे सकाळी ११ वा. आयोजित करण्यात आला आहे.

खा. सुनील तटकरे महाराष्ट्र विधान मंडळात आमदार असताना त्यांनी केलेल्या काही भावस्पर्शी भाषणांचे संकलन या पुस्तकात करण्यात आले असून हा प्रकाशन सोहळा देशाचे जेष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे. तसेच यावेळी माजी गृहमंत्री, काँग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, विरोधी पक्ष नेते अजित पवार, खा. सुप्रिया सुळे, मा. केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल, रा. कॉ. म. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मा. मंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, मा. मंत्री हसन मुश्रीफ, आ. भास्कर जाधव या प्रमुख नेत्यांची उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आ. अनिकेत तटकरे, आ. आदिती तटकरे, आ. धनंजय मुंढे यांनी केले आहे असे मा. ता. रा. कॉ. अध्यक्ष सुभाष केकाणे यांनी सांगितले. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या