माणगाव तालुक्यातील ६० वर्षीय वृद्ध बेपत्ता.
माहिती मिळाल्यास कळविण्याचे माणगाव पोलिसांचे आवाहन.
पोलीस प्रवाह न्यूज
माणगाव-दि. १३- माणगाव तालुक्यातील साई-मोर्बा विभागातील एक ६० वर्षीय वृद्ध इसम बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी अरविंद बाळकृष्ण पालकर रा. चांदोरे यांचे भाऊ सुभाष बाळकृष्ण पालकर वय वर्षे ६० हे दि. १० सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातून सकाळी प्रात्यविधी करीता रानमाळमधे गेले त्यानंतर परतलेच नाहीत. यानंतर घटनेतील फिर्यादी यांनी रानमाळमध्ये जाऊन शोध घेतला असता ते कोठेही आढळून आले नाहीत. त्यानंतर नातेवाईक यांच्याकडे चौकशी केली असता सदर इसम कोठेही आढळून आला नाही.
सदर व्यक्तीचे वर्णन सुभाष बाळकृष्ण पालकर वय वर्षे ६० रा. चांदोरे ता. माणगांव चेहरा लांबट, केस पांढरे, डोळे काळे, उंची ५ फूट, अंगात नेसूस खाकी कलर ची हाफ पॅन्ट, लाल काळ्या रंगाचा चौकडी टी-शर्ट, पायात तांबड्या रंगाची चप्पल असे आहे. पुढील तपास माणगाव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव पोलीस करत आहेत. माणगाव पोलीस ठाणे येथे या घटनेची नोंद मनुष्य मिसिंग २६/२०२२ प्रमाणे करण्यात आली आहे. तरी सदर वर्णनाचा इसम कोठेही आढळुन आल्यास सहाय्यक फौजदार सूर्यकांत भोजकर मो. क्र. ९७६७१५२१३८ व माणगाव पोलीस ठाणे फोन ०२१४०-२६३००५ या नंबरवर संपर्क साधून कळवावे असे आवाहन माणगाव पोलिसांकडून करण्यात आले आहे.



0 टिप्पण्या