महाराष्ट्र ऑलिम्पिक गेम्स वुशु क्रीडा स्पर्धेत ऋषिकेश पुंडलिक मालोरे याने पटकावले सुवर्णपदक
पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव-दि. १४- महाराष्ट्र ऑलिम्पिक गेम्स २०२२-२०२३ पुणे येथे संपन्न झाल्या. दि. ९ जानेवारी ते १२ जानेवारी या कालावधीत वुशु मार्शल आर्टस् या खेळाच्या स्पर्धा सम्पन्न झाल्या. या स्पर्धेत माणगांव तालुक्यातील प्रसिध्द वकील ऍड. पुंडलिक मालोरे यांचे सुपुत्र कु. ऋषिकेश पुंडलिक मोलोरे याने सुवर्णपदक पटकावले.
या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातून सर्व जिल्ह्यातून उत्कृष्ट स्पर्धक सहभागी झाले होते. सदर स्पर्धेत रायगड जिल्हयातील सहा स्पर्धक सहभागी झाले होते. या सहा स्पर्धक माणगांव तालुक्यातील दोन स्पर्धक सहभागी झाले होते. या दोन्ही स्पर्धकांनी पदक प्राप्त करुन माणगाव तालुकाचे व रायगड जिल्हयाचे नाव महाराष्ट्र ऑलिम्पिक इतिहासात कोरले. या स्पर्धेत कु. ऋषिकेश पुडलिक मालोरे या विद्यार्थ्याने सुवर्ण पदक पटकावले तर कु. तन्वी किशोर जुमारे या विद्यार्थिनीला कास्य पदक मिळाले आहे. ऋषिकेश मालोरे हा विद्यार्थी एक राष्ट्रीय खेळाडू असून तो इयत्ता १० वी पासून वुशु हा खेळ खेळत आहे. ऋषिकेशला या खेळाची खुपच आवड आहे. प्रसंगांना सामोरे जाऊन त्याने आपला राष्ट्रीय सत्र पर्यंतचा प्रवास केला आहे. ऋषिकेशने आता पर्यंत वुशू या खेळात आठ राष्ट्रीय स्पर्धा भारताच्या विविध ठिकाणी जाऊन खेळला आहे. भावी आयुष्यात ऑलिम्पिक स्पर्धा खेळण्याचा त्याचा मानस आहे. आज पर्यंत त्याने विवीध राष्ट्रीय स्पर्धेत ४ पदके प्राप्त केली आहेत. भविष्यात तो एक शिव छत्रपती पुरस्कार विजेता खेळाडू असेल हि गोष्ट नाकारता येत नाही. ऋषिकेशच्या या सगळ्या यशा मागे त्याचे मार्गदर्शक मंदार चवरकर, रायगड वुशू असोसिएशनचे सचिव दत्तात्रेय पाटील सर तसेच महत्वाचा वाटा त्याचे वडील ऍड. पुंडलिक मालोरे व त्याची आई प्रज्ञा पुंडलिक मालोरे यांचा आहे. ऋषिकेशने वुशु स्पर्धेत सुवर्णपदक पटकविल्यानंतर सर्व स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून सर्वांनी त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.




0 टिप्पण्या