सुमंगल लोकोत्सव कार्यक्रमात सर्वांनी सहभाग घ्यावा- काडसिद्धेश्वर स्वामीजी महाराज.
पोलीस प्रवाह न्यूज
सिद्धगिरी : दि. १० -सिद्धगिरी मठ येथे २० ते २६ फेब्रुवारी २०२३ रोजी होणाऱ्या ‘सुमंगलम’ या कार्यक्रमासंदर्भात महाराष्ट्र शासनाकडून आज मंत्रालय, मुबई येथे विविध शासकीय विभागांची बैठक संपन्न झाली. यावेळी मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी शासनाच्या विविध विभागांना या उत्सवाच्या संदर्भात सूचना दिल्या व आढावा घेतला. हा लोकोत्सव भव्य प्रमाणात साजरा व्हावा यासाठी शासकीय यंत्रणांनी आपले भरीव योगदान देवून सहभाग नोंदवावा असे आवाहन यावेळी पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींनी केले.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस, मा. चंद्रकांत दादा पाटील, मा. दिपकजी केसरकर यांच्यासह विविध विभागांचे सचिव व अधिकारी उपस्थित होते.या उत्सवासाठी जगभरातून सुमारे ३० ते ४० लाख लोक उपस्थित राहणार असल्याचा अंदाज असून त्यासाठी जय्यत तयारी सुरु आहे.




0 टिप्पण्या