माणगाव तालुका पत्रकार संघातर्फे पत्रकार दिन उत्साहात साजरा
पोलीस प्रवाह न्यूज
माणगाव-दि. ६- माणगाव तालुका पत्रकार संघातर्फे पत्रकार दिन मोठया उत्साहात व विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. सालाबादप्रमाणे यावर्षीही तालुका पत्रकार संघातर्फे उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे शुक्रवार दि. ६ जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्त औषध व फळवाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. औषध वाटप कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेश युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दिपकशेठ जाधव यांच्याहस्ते तर फळवाटप कार्यक्रम रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष पंकज तांबे व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी प्रदेश राष्ट्रवादीचे युवक सचिव दिपकशेठ जाधव, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष पंकज तांबे, दक्षिण रायगड मनसेचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड व उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक दिलीप पगारे यांनी पत्रकार संघाच्या कार्याचा गौरव करीत पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला माणगाव उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप पगारे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून उपस्थित सर्व मान्यवर तसेच पत्रकारांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. सुरुवातीला माणगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सलीम शेख यांनी पत्रकार संघाच्या गेल्या पाच वर्षाच्या काळातील कार्यक्रमांचा सविस्तर आढावा घेत उपस्थित सर्व मान्यवर व पत्रकार यांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमास भाजपच्या पंचायत राज व ग्रामविकास विभागाच्या संयोजिका शर्मिला सत्वे, माणगाव नगरसेविका ममता थोरे, नगरसेवक दिनेश रातवडकर, शिक्षिका विनया जाधव, कृषी अधिकारी प्रमोद देशमुख, अविष्कार फाऊंडेशनचे भालचंद्र खाडे, माजी ग्रामपंचायत सदस्य रणधीर कोनोजे, प्रा.हर्षल जोशी, सामाजिक कार्यकर्ते संभाजी गायकवाड, स्वप्नील शिर्के, रुग्णालयातील कर्मचारी, परिचारिका आदींसह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माणगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सलीम मुबारक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली जेष्ठ पत्रकार मजिद हाजिते, आजेश नाडकर, डॉ.आरिफ पागारकर, सचिन देसाई, प्रभाकर मसुरे, स्वप्ना साळुंके, देवयानी मोरे, सायली दळवी, दीपक दपके, संतोष गायकवाड, नरेश पाटील, नुरुद्दीन सनगे आदींसह संघटनेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेऊन पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा केला.

.jpeg)
.jpeg)

0 टिप्पण्या