महालक्ष्मी निवारा प्रकरण संबंधी पोलीसांचे माणगाव वासियांना आवाहन.

 महालक्ष्मी निवारा प्रकरण संबंधी पोलीसांचे माणगाव वासियांना आवाहन.

पोलीस प्रवाह न्यूज

माणगांव-दि. ५-  माणगांव शहरातील उतेखोलवाडी येथील महालक्ष्मी निवारामध्ये दि. ४ जानेवारी रोजी बिल्डिंग क्र. ३ मधील ए व बी विंगच्या टेरेस व जिन्यामध्ये तसेच रस्त्यावर रक्ताचे ठिपके आढळून आले होते. तसेच दिनांक ५ रोजी  महालक्ष्मी निवाऱ्यामध्ये बिल्डिंग क्र. २ मध्ये तिसऱ्या मजल्यावर रूम नं. ३०१ मध्ये एका ३० वर्षीय विवाहित तरुणाने पंख्याला ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. 

सदर प्रकरणांचा एकमेकांशी काहीही संबंध नसून दोन्ही घटना या वेगवेगळ्या बिल्डिंगमध्ये घडलेल्या आहेत. कोणी ही अफवांनवर विश्वास ठेऊ नये व खोट्या अफवा पसरवू नये. घडलेल्या दोन्ही प्रकरणाचा पोलीस सखोल तपास करीत आहेत, असे आवाहन माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या