माणगाव बामणोली येथे सामाजिक सभागृह बांधकामासाठी आ.आदिती तटकरे यांच्या आमदार निधीतून १० लाखाचा निधी.
माणगाव : दि. ५ - श्रीवर्धन विधानसभा मतदार संघाच्या आ.आदिती सुनील तटकरे यांच्या सन २०२२-२३ करिता आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत माणगाव तालुक्यातील बामणोली गाव येथे सामाजिक सभागृह बांधण्यासाठी १० लाख रुपयांचा निधी आ. आदिती तटकरे यांनी उपलब्ध करून देऊन तशा आशयाचे पत्र नुकतेच खा. सुनील तटकरे व आ.आदिती तटकरे यांनी आपल्या हस्ते सुतारवाडी येथे या विभागातील पक्षाचे जेष्ठ नेते महादेवराव बक्कम तसेच बामणोली ग्रामस्थ वामन पवार, भारत राम पवार, नामदेव सकपाळ, संभाजी भालेकर, भारत पवार यांच्याकडे दिले. बामणोली गावातील सभागृहासाठी आ.आदिती तटकरे यांनी भरभरून निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे व खा. सुनील तटकरे यांचे जेष्ठ नेते महादेवराव बक्कम व बामणोली ग्रामस्थ यांनी मनोमन आभार मानले.
श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातील माणगाव, रोहा, तळा, म्हसळा, श्रीवर्धन या पाचही तालुक्यात विकासकामांचा झंझावात आ. आदिती तटकरे यांनी सुरु ठेवला आहे. सत्ता असो नसो विकासनिधी आपण कमी पडू देणार नसल्याचे खा. सुनील तटकरे व आ. आदिती तटकरे यांनी माणगाव तालुक्यातील बामणोली गावातील सामाजिक सभागृहाला १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्यावर प्रसार माध्यमांजवळ बोलताना सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा विकासकामांना प्राधान्य देणारा पक्ष असून मतदार संघातील प्रलंबित सर्व विकासकामे टप्प्याटप्प्याने जरूर मार्गी लावली जातील असे आ. आदिती तटकरे यांनी यावेळी बामणोली ग्रामस्थांना बोलताना आश्वासित केले.



0 टिप्पण्या