बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव बाळासाहेब ठाकरे गट माणगांव तर्फे उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे फळवाटप

 बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव बाळासाहेब ठाकरे गट माणगांव तर्फे उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे फळवाटप

पोलीस प्रवाह न्यूज 

माणगांव-दि  २३- हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे सोमवार दि. २३ जानेवारी रोजी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना माणगांव तालुक्याच्या वतीने दरवर्षीप्रमाणे रुग्णांना फळवाटप करण्यात आले. 

या कार्यक्रमासाठी दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगणे, डॉ. सचिन गोमसाळे,  तालुका प्रमुख गजानन अधिकारी, विधानसभा संघटक संजय घोसाळकर, उपतालुका प्रमुकज चंद्रकांत पवार, डॉ. देशमुख,  महिला आघाडी तालुका प्रमुख शिवानी म्हामूणकर, विभाग प्रमुख सिकंदर आंबोणकर, प्रभाकर ढेपे, किरण धुमाळ, लक्ष्मण म्हाळूंगे, शिवाजी गावडे, अक्षय कदम, चंद्रकांत यादव, किशोर बामुगडे, माणगाव युवासेना अधिकारी अजिंक्य जाधव,  अभिजित घोणे, राजु चव्हाण, अनिल सोनार, डॉ. आरिफ पागारकर, विश्वास बागवे, विजय जाधव, प्रमोद खेतम, उपजिल्हा रुग्णालय कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी युवासैनिक, महीला आघाडी प्रमुख, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांनी सांगितले की, बाळासाहेबांची जयंती म्हणजे शिवसैनिकांचा भाग्याचा दिवस. सर्वजण या दिवसाची आतुरतेने वाट बघत असतात. ज्यांनी शिवसेनेला जन्म दिला, घडवलं त्या बाळासाहेबांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रात साजरी केली जाते. यावेळी माणगांव तालुकाप्रमुख गजानन अधिकारी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या