कशेणे येथील अपघात ब्लॅक पॉईंट माणगांव पोलीस व कशेणे ग्रामस्थांतर्फे स्वच्छ
माणगांव-दि.२३- मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम गेली १२ वर्ष चालूच आहे. या राष्ट्रीय महामार्गावर माणगांव तालुक्यात अनेक अपघात होऊन शेकडो नागरिकांचे प्राण गेले आहेत. काही ठिकाणी तर अपघातांचे ब्लॅक पॉईंट झाले आहेत.
असाच एक अपघात ब्लॅक पॉईंट मुंबई गोवा महामार्गावर माणगांव तालुक्यातील मौजे येथे कशेणे येथे आहे. या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला झाडी झुडपे वाढली होती. तसेच या ठिकाणी असलेल्या वळणामुळे माणगांवकडे जाणाऱ्या गाडयांना समोरून येणारी गाडी वळणावर दिसत नसल्याने या ठिकाणी अनेक अपघात सर्रास होत आहेत. सदरील परिस्थितीचे दखल घेत व होणारे अपघात टाळण्यासाठी माणगांव पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील व कशेणे ग्रामस्थ यांच्या सहकार्याने या अपघात ब्लॅक पॉईंट जवळ असलेली झाडे तोडून माती आणून त्या वळणावर जेसिबीच्या साहाय्याने टाकण्यात आली. व तेथील परिसर स्वच्छ करण्यात आला.
यावेळी पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष पंकज तांबे, पोलीस हवालदार कोळेकर, पोलीस शिपाई मिसाळ, स्वप्नील शिर्के, सचिन गोडबोले, कशेणे ग्रामस्थ उपस्थित होते.




0 टिप्पण्या