सिद्धनेर्ली- नदीकिनारा येथील जलकुंभ लोकार्पण सोहळा संपन्न.

सिद्धनेर्ली- नदीकिनारा येथील जलकुंभ लोकार्पण सोहळा संपन्न.

पोलीस प्रवाह न्यूज 

कोल्हापूर: दि. २२ -नदीकिनारा सिध्दनेर्ली ता. कागल येथील स्मशानभूमी परीसरात अक्षय ग्रुपच्या वतीने बांधलेल्या जलकुंभ व कै.पांडुरंग शंकर लाड यांच्या स्मरणार्थ श्रीयुत पोपट पांडुरंग लाड यांनी बांधलेल्या पार कट्ट्याचा लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला.लोकप्रिय सरपंच मा.दत्तात्रय पाटील व डे. सरपंच सौ.संगिता पोवार (वहिनी) यांच्या हस्ते जलकुंभ व पार कट्टा पूजन करण्यात आले.यावेळी बोलताना सरपंच म्हणाले की,अक्षय ग्रुपच्या वतीने गावात  सामाजिक बांधिलकी जपत वेगवेगळे उपक्रम राबविले जातात ही बाब कौतुकास्पद आहे.तसेच सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या नवनवीन सामाजिक संघटना उदयास येत असले बद्दल सरपंच यांनी समाधान व्यक्त केले.

   यावेळी निसर्ग व पर्यावरण संघटनेचे अध्यक्ष मधुकर येवलुजे यांनी नदीकिनारा स्मशानभूमी परीसर व गावातील वैकुंठभुमि नदिघाट सुशोभीकरणासाठी अनेक दानशूर व्यक्ती पुढे येत असल्याचे सांगितले.नदीकिनारा येथील झाडासाठी  सुजित खोत यांनी नवीन पार कट्टा,तसेच मधुकर येवलुजे, तानाजी पोवार सर,गंगाराम हजारे, जयवंत पोवार व एम.पी गोनुगडे यांनी  नदीकिनारा येथील स्मशानभूमी परीसरातील सुशोभीकरणासाठी प्रत्येकी एक या प्रमाणे पाच सिमेंट ची बाकडी बसवण्यात येणार असल्याची माहिती दिली.

   यावेळी अक्षय ग्रुप ,निसर्ग व पर्यावरण संघटनेच्या वतीने स्मशानभूमी परीसरातील स्वच्छता करण्यात आली.स्वागत गंगाराम हजारे तर आभार एम.पी. गोनुगडे यांनी व्यक्त केले.यावेळी ग्रा.पं.सदस्य मनोहर लोहार,मा.कृष्णात मेटील,व्ही.जी.पोवार सर, विजय कुरणे, जयवंत पोवार, विक्रम माने,सचिन बल्लाळ,कृष्णात घराळ,तानाजी पोवार,पोपट लाड,सतिश निकम, रोहिदास माने, दिपक माने, पवन पोवार आदी मान्यवर उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या