माणगांव अपघातात बचावलेल्या ४ वर्षीय भव्य पंडितचा देखील दुर्दैवी मृत्यु.
माणगांव-दि. १९- आज सकाळी दि. १९ जानेवारी रोजी माणगाव मुंबई गोवा महामार्गावर लोणेरे विभागातील रेपोली गावच्या हद्दीत झालेल्या भीषण अपघातात एक ४ वर्षीय चिमुरडा भव्य पंडित बचावला होता. त्याला वाचविण्यासाठी आरोग्य यंत्रणेने शर्तीचे प्रयत्न केले. या अपघातात एकूण ९ जणांचा मृत्यू झाला होता. मुलाला मुंबईमध्ये उपचारासाठी नेत असताना दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
यामुळे आता मृतांची संख्या १० वर पोहचली आहे. माणगाव उपजिल्हा रुग्णालयात भव्य वर प्राथमिक उपचार सुरू होते. मात्र त्याची प्रकृती खालावली असल्याने त्याला जे. जे. रुग्णालयात हलविण्यात येत होते. मात्र अर्ध्या रस्त्यातच त्याची प्राणज्योत माळवली. मुंबईकडून हेदवी ता. गुहागरकडे जाणाऱ्या त्या १० जणांसाठी १९ जानेवारीची रात्र काळ रात्रच ठरली.
काळाने घाला घातला असेल तरी, सध्या मुंबई गोवा महामार्गाच्या कूर्मगतीने सुरू असलेल्या कामावर माणगावकर नागरिक शंका उपस्थित करत आहेत. तर कन्स्ट्रक्शन कंपनीने वळण दिशादर्शक बसवले नसल्याने ट्रक विरुद्ध बाजूवरून येऊन इको कारला ठोकर देऊन भीषण अपघात घडला आहे अशी चर्चा देखील माणगाव तालुक्यात सुरू आहे.
अपघातातील मयतांची नावे- १)अमोल चंद्रकांत जाधव, वय ४० वर्ष, रा. हेदवी, ता. गुहागर
२)निलेश चंद्रकांत पंडित, वय ४५ वर्ष, रा. हेदवी, ता. गुहागर
३)निशांत शशिकांत जाधव, वय २३ वर्ष, रा. विरार पूर्व
४)दिनेश रघुनाथ जाधव, वय ३० वर्ष, रा. हेदवी, ता. गुहागर
५)स्नेहा संतोष सावंत, वय ४५ वर्ष, रा. कलमबिष्ट सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
६)कांचन काशिनाथ शिर्के, वय ५८ वर्ष, रा. चिपळूण
७)दिपक यशवंत लाड, वय ६० वर्ष, रा. कॉटनग्रीन मुंबई
८)मुद्रा निलेश पंडित, वय १२ वर्ष, रा. हेदवी, ता. गुहागर
९)नंदिनी निलेश पंडित, वय ४० वर्ष, रा. हेदवी, ता. गुहागर,
१०) भव्य निलेश पंडित, वय ४ वर्ष, रा. हेदवी, ता. गुहागर



0 टिप्पण्या