माणगाव कंटेनर च्या धडकेत २ जणांचा मृत्यू.
पोलीस प्रवाह न्यूज
माणगाव : दि. १५ - माणगाव तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावर तिलोरे गावच्या हद्दीत व रात्री १ वाजण्याच्या सुमारास झालेल्या कंटेनर व मोटारसायकल च्या अपघातात दोन इसमानी प्राण गमावल्याची घटना घडली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार सविस्तर वृत्त असे की,घटनेतील फिर्यादी राजेंद्र रायका हे त्यांच्या ताब्यातील स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एम एच ०६ बी ई ७१७७ ही स्वतः चालवत इंदापूर बाजूकडून माणगाव बाजूकडे येत असताना,माणगाव बाजूकडून मुंबई बाजूकडे जाणारा कंटेनर क्रमांक एम एच ४६बी एम ०६७६ वरील अज्ञात चालकाने त्याच्या ताब्यातील कंटेनर रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवून राजेंद्र रायका यांच्या कार समोरून माणगाव बाजूकडे चालणारी मोटारसायकल क्रमांक एम एच ०२ ई जी १३८५ व त्या मोटारसायकलवरील दोन इसम विशाल संजय सकपाळ रा. दिवा पूर्व व राजेश राजाराम धामणकर वय वर्षे ३०रा खार पूर्व यांना ठोकर मारून अपघात केला व कंटेनर चा अज्ञात चालक अपघात करून तेथुन पळून गेला.या अपघातात मोटारसायकलवरील दोन्ही इसमांचा मृत्यू झाला आहे.
या प्रकरणी माणगाव पोलीस ठाणे येथे कॉ. गु.रजि. नं ०९/२०२३ भा दं वि स कलम ३०४ अ,२७९,३३७,३३८.मोटार वाहन कायदा कलम १८४ ,१३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक लहांगे हे करीत आहेत.




0 टिप्पण्या