अंगणवाडीतील बालचमुंच्या नृत्याविष्काराने बाचणी पंचक्रोशीतील रसिक मंत्रमुग्ध.
सिद्धीनेर्ली बीट तर्फे वार्षिक स्नेह संमेलन व बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न.
पोलीस प्रवाह न्युज
कोल्हापुर : दि. ११ - एकात्मिक बालविकास प्रकल्प कागल मधील सिद्धीनेर्ली बीट अंतर्गत येणाऱ्या सर्व अंगणवाड्यामधील चिमुकल्याचे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण कार्यक्रम बाचणी ता.कागल येथील जाधव हॉल मध्ये संपन्न झाला.
रोपाला पाणी घालुन कार्यक्रमाला सुरवात झाली.महिला बाल कल्याण विभाग बालकांचा सर्वांगीण विकास व्हावा ह्यासाठी कटिबद्ध असते मुलांचा सांस्कृतिक विकास व्हावा ह्या उद्देशाने पर्यवेक्षीका अश्विनी आकुर्डे यांच्या अथक परिश्रमाने पहिल्यांदाच भव्य स्नेहसंमेलन पार पडले.ह्यावेळी गट विकास अधिकारी सुशील संसारे, माजी जि.प.सदस्य मनोज फराकटे,बाचणी सरपंच जयश्री पाटील इ. मनोगते झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविकमध्ये आकार अभ्यासक्रम, 0-3 वर्ष वयोगटातील बालकांसाठीचे आरंभ प्रशिक्षण या विषयावर पर्यवेक्षिका आश्विनी आकुर्डे यांनी मार्गदर्शन केले.
सिद्धीनेर्ली बीट अंतर्गत येणाऱ्या बामणी,एकोंडी,बाचणी,साके व सिद्धीनेर्ली ह्या पाच गावच्या अंगणवाड्या सहभाग घेतला.देश भक्ती,बालगीते,शेतकरी नृत्य, कोळीगीते,लावणी इ.गानांच्या तालावर सुंदर नृत्य सादरीकरण केले गेले.प्रत्येक गाण्यांवर टाळ्यांचा मोठा प्रतिसाद दिला.तर ३ ते ६ वयोगटातील मुलांसाठी लंगडी,पोत्यात पाय घालुन धावणे,बेडुक उड्या इ. तर कुटुंबातील आई,आजोबा,चुलता ह्यांच्यासाठी धावणे, लंगडी अश्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.
ह्यावेळी पंचायत समिती कागल गटविकास अधिकरी सुशील संसारे यांनी बालस्नेही पंचायत या विषयावर मार्गदर्शन केले तसेच माजी जि प सदस्य मनोज फराकटे,माजी पं.स सदस्य पुनम महाडिक,अंजना सुतार, प्रकल्पधिकारी विद्या लांडगे,बाचणी सरपंच जयश्री उत्तम पाटील,दत्तात्रय जाधव,माजी सरपंच नायकवडी,ग्रा.पं.सदस्य सुजित खामकर, रमेश कांबळे, पर्यवेक्षिका चव्हाण,गवळी, सावंत, मुख्याध्यापक इ.उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करणेसाठी सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी अधीक मेहनत घेतली.कार्यक्रमाचे श्रवणीय असे सुत्रसंचालन विनायक सातुसे तर आभार पर्यवेक्षिका शशिकला पोवार यांनी मानले.




0 टिप्पण्या