चिंचवड धारिवाल पॉलिटेक्निकचे यश.

 चिंचवड धारिवाल पॉलिटेक्निकचे यश.


पोलीस प्रवाह न्यूज

पुणे-दि. १० डिसेंबर- वाय बी पाटील पॉलिटेक्निक, आकुर्डी येथे झालेल्या राज्यस्तरीय पोस्टर प्रेझेन्टेशन स्पर्धे मध्ये रसिकलाल एम धारिवाल पॉलिटेक्निकच्या विद्यार्थिनी सपना अयोलकर आणि आर्या भडगावकर यांना दुसरे पारितोषिक मिळाले. त्यांनी सागरी प्रदूषण या विषयावर आपले मत मांडले होते.यामध्ये प्रामुख्याने सागरी प्रदूषण का होते आणि त्याचा मानवी जीवनावर काय दुष्परिणाम होऊ शकतो याबद्दल त्यांनी माहिती दिली. तसेच हे दुष्परिणाम थांबवायचे असेल तर त्याच्या काय काय उपाययोजना भविष्यात करता येऊ शकतात याबद्दल माहिती दिली.

    या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्रीमान प्रकाशजी रसिकलालजी धारिवाल, ऑनररी जनरल सेकेटरी  श्रीमान अॅड. राजेंद्रकुमारजी शंकरलालजी मुथा, चेअरमन श्रीमान. शांतीलालजी लुंकड, मानद कार्यकारी अधिकारी श्री खिल्लारी सर, तंत्रनिकेतनचे प्राचार्य श्री अनिल थिटे, संगणक विभागाच्या विभाग प्रमुख श्रीमती अपूर्वा देशपांडे मॅडम आणि श्री श्रीराम खडके सर यांनी विद्यार्थ्यांनीचे अभिनंदन केले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या