खर्डी खुर्द येथे अखंड हरिनाम सप्ताह संपन्न.

 खर्डी खुर्द येथे अखंड हरिनाम सप्ताह संपन्न.



पोलीस प्रवाह न्यूज

माणगांव-दि. १२ माणगांव तालुक्यातील खर्डी खुर्द येथे  सालाबादप्रमाणे या ही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायणचे आयोजन दि. ७ डिसेंबर ते १३ डिसेंबर दरम्यान करण्यात आले होते. 

या सप्ताहात रोज सकाळी ७ ते ११ पारायण, दुपारी १२ ते ३ जेवण, ४ ते ५ गाथेवरील भजन, सायंकाळी ५ ते ६ प्रवचन, ६ ते ७ हरिपाठ, रात्री७ ते ८ भोजन, ९.३० ते ११०.३० कीर्तन, १२ ते ४ हरीजागर,  ४.३० ते ५.३० काकडा असे कार्यक्रम होत होते. दि. ७ ते १२ डिसेंबर दरम्यान ह. भ. प. श्री. सुंदर महाराज निमण, नवनाथ शिंदे, प्रकाश महाराज सुतार, मारुती महाराज महाडीक, कृष्णा महाराज दवंडे यांचे प्रवचन झाले. तसेच ह. भ. प. श्री. सुंदर महाराज निमण, रवि महाराज तटकरे, प्रकाश महाराज सुतार, वांजले महाराज, होजगे महाराज, अमित महाराज म्हात्रे यांचे कीर्तन झाले. या सप्ताह कार्यक्रमाला अनेक देणगीदार व अन्नदाते लाभले होते. त्यांचे ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ व नवतरुण मित्र मंडळ खर्डी खुर्द यांनी आभार मानले. गुरुमाऊली ह. भ. प. श्री. वासकर महाराज यांच्या कृपादृष्टीखाली, वैकुंठवासी ह. भ. श्री. पांडुरंग महाराज येरोलेकर यांच्या प्रेरणेने, ह. भ. प. श्री. सुंदर महाराज निमण यांच्या नेतृत्वाखाली  अखंड  हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता. अतिशय भक्तिमय वातावरण हा सप्ताह कार्यक्रम संपन्न झाला.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या