माणगावमध्ये चक्काजाम वाहतूककोंडी.
पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव-दि. २४- माणगांव शहरात वाहतुक कोंडीची समस्या माणगांवकर नागरिकासाठी काही नवीन नाही.. वीकेंड शनिवार, रविवार कधी तर शुक्रवारी संध्याकाळी पासून माणगाव बाजारपेठेतील मुंबई गोवा महामार्ग चक्का जामच असतो.मात्र २४डिसेंबर रोजी सकाळी ७ पासूनच माणगांव बजापेठेत मुंबई गोवा महामार्ग पुणे दिघी महामार्गावर वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या.
ख्रिसमस (नाताळ)सण साजरा करण्यासाठी मुंबई व पुणे कडून रायगड रत्नागिरी कडे येणाऱ्या पर्यटकांची व शनिवार रविवार वीकेंड साठी येणारे नोकरदार यांची गर्दी वाढल्याने माणगांव शहरात वाहनांची तोबा गर्दी झाली होती. माणगाव वाहतूक पोलीस शाखा, गृहरक्षक दलाचे जवान यांनी देखील स्वतः हायवेवर येऊन वाहतूक कोंडी नियंत्रणात आणण्याकरीता आटोकाट प्रयत्न केले. पण मुंबई गोवा महामार्गाच्या माणगाव बायपास चे काम झाले तर,माणगाव मधील वाहतूक कोंडीची समस्या मार्गी लागेल असे मत माणगांवकर नागरिकांनी तालुक्यातील प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले आहे.
बामणोली रोड मॉर्बा रोड(पुणे -रोड ला जोडणाऱ्या अंतर्गत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्याय.
माणगांव शहरातील बजापेठेतील सतत ची वाहतूक टाळण्यासाठी माणगांव नगरपंचायतीच्या माध्यमातून देखील पूर्ण प्रयत्न करण्यात आले आहेत. तत्कालीन माणगांव शहराच्या प्रथम महिला नगराध्यक्षा योगिता चव्हाण यांच्या प्रयत्नाने बामणोली रोड ते मोरबा रोड (पुणे दिघी हायवे) असा अश्या अंतर्गत जोडरस्त्याचे काम झाले असल्याने बामणोली मोरबा किंवा अंतर्गत खेडोपाड्यातून येणाऱ्या वाहनचालकांना वाहतुककोंडीचा सामना न करता बाजारपेठेत येण्याचा मार्ग सुखर झाला आहे. असे असले तरी पुणे मुंबई कडून येणाऱ्या वाहनांमुळे बाजारपेठेत आठवड्यातुन ४ दिवस शुक्रवार ते सोमवार वाहतूक कोंडी अटळच असते असे नागरिकांकडून बोलले जात आहे.
माणगाव बायपास चे काम वेळीच मार्गी लागल्यास शहरी बाजारपेठेतील वाहतूककोंडी कमी होणार
मुंबई गोवा महामार्गाच्या कामामध्ये माणगांव शहराला बायपास देण्यात आला आहे. हा बाह्यवळण मार्ग माणगाव गोद नदीवरील असलेल्या कळमजे पुलापासून नानोरे, उतखोल ,भादाव,विंचवली ते मुगवली फाट्यापर्यत आहे. या बाह्यवळण महामार्गाचे काम चेतक इंटरप्रायझेस नावाची कन्स्ट्रक्शन कंपनी करत आहे.या कंपनीने लवकरात लवकर या बायहवळणाचे काम करावे व माणगांव तालुकवासीयांची नेहमीची डोकेदुखी ठरलेल्या वाहतूककोंडी पासून सुटका करावी अशी मागणी संतप्त माणगांवकर नागरिक करताना दिसत आहेत.





0 टिप्पण्या