माणगावचे प्रतिष्ठित व्यापारी राजनभाई मेथा यांचे निधन
माणगांव-दि. २४- माणगांव येथील प्रसिद्ध व्यापारी विजयशेठ चुनीलाल मेथा यांचे लहान बंधु प्रतिष्ठित व्यापारी व अशोकदादा साबळे विद्यालयाचे स्कूल कमिटी चेअरमन कै.राजनभाई चुनीलाल मेथा यांचे शनिवार दि.२४ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ४ वाजता अपोलो हाँस्पिटल येथे ह्रदय विकाराच्या आजाराने निधन झाले. म्रुत्यु समयी त्यांचे वय-५९ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात १ भाऊ,१ बहीण, पत्नी,१ मुलगा,१ मुलगी असा परीवार आहे. त्यांच्या निधनाने मेथा कुटुंबियांवर तसेच त्यांच्या मित्रपरिवारावर, नातेवाईकांवर व नवरात्र मित्रमंडळ माणगाव यांच्यावर शोककळा पसरली आहे.
कै.राजनभाई मेथा हे शांत व संयमी स्वभावाचे असे मनमिळाऊ व्यक्तीमत्व होते.ते माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या अशोकदादा साबळे विद्यालयाचे स्कूल कमिटी चेअरमन होते. माणगाव मधील ते १ प्रसिद्ध व्यापारी होते. राजन हार्डवेअर नावाचे त्यांचे माणगाव मध्ये गेली अनेक वर्षांपासून दुकान आहे. सामाजिक कार्यात ते नेहमीच आग्रेसर होते.त्यांना माणगाव तालुका पत्रकार संघातर्फे गेल्या वर्षी यशस्वी उद्योजक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून ह्रदय विकाराच्या आजाराने ते त्रस्त होते. त्यांची प्रक्रती ढासळु लागल्याने त्यांना औषधोपचारासाठी अपोलो हाँस्पिटल नेरुळ येथे दाखल करण्यात आले होते. याठिकाणी शनिवारी त्यांचे निधन झाले.कै.राजनभाई मेथा यांच्या पार्थिवावर आज रविवार दि.२५ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता माणगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांचे मोठे बंधू विजयशेठ मेथा यांनी सांगितले.



0 टिप्पण्या