माणगावमध्ये मुले चोरणारी टोळी सक्रिय❓

 माणगावमध्ये मुले चोरणारी टोळी सक्रिय❓

माणगांवमध्ये मुले चोरणाऱ्या टोळीच्या अफवांवर विश्वास ठेवू नका- पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील


पोलीस प्रवाह न्यूज

 माणगांव-दि. २४- महाराष्ट्र राज्यात व आजूबाजूच्या राज्यातून मुले चोरणाऱ्या टोळ्या सक्रिय असल्याचे बोले जात आहे. माणगांव तालुक्यात मुले चोरणाऱ्या टोळीच्या अफवा पसरत आहेत. परंतु, अशी कोणतीही टोळी माणगांव तालुक्यात नसून अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन माणगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी केले आहे.

माणगांव शहरातील मुंबई गोवा महामार्गावर असलेल्या एस टी डेपो माणगांव समोरील पोलीस चौकी जवळ दि. २३ डिसेंबर रोजी रात्री ७ वा च्या सुमारास एक तरुण व त्याचे काही साथीदार मुले चोरत असल्याचे समजून एका तरुणाला पकडण्यात आले. मात्र सत्यता पाहता याचा काही मात्र समंध नसल्याचे समजते. मात्र  त्यावेळी काही नागरिकांनाकडून सोशल मीडियावर मुले चोरणाऱ्या टोळीला पकडले असून ते माणगांव शहरातून मुले चोरत असल्याचे मॅसेज व फोटो  टाकण्यात आले. या प्रकरणाची संपुर्ण माहिती घेतली असता अशी कोणतीही टोळी माणगांव तालुक्यात सक्रिय नसून मुले चोरण्याचा कोणताही प्रकार माणगांव तालुक्यात घडलेला नाही.  सोशल मीडियावर कोणताही मॅसेज टाकताना त्यांची सत्यता नागरिकांनी तपासून घ्यावी. कोणतीही आक्षेपार्ह गोष्ट आढळल्यास तात्काळ माणगांव पोलीस ठाणे येथे संपर्क करण्याचे आवाहन माणगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या