पाणसई गावात आर डी नॅशनल कॉलेज बांद्रा तर्फे विविध सामाजिक उपक्रम
पोलीस प्रवाह न्यूजमाणगांव-दि. ३०- माणगांव तालुक्यातील इंदापूर नजिक असलेल्या पाणसई गावात दरवर्षी आर डी नॅशनल कॉलेज बांद्रा तर्फे सामाजिक बांधिलकी जपत विविध कार्यक्रम घेण्यात येतात. कॉलेजच्या एन. एस.एस. विद्यार्थ्यामार्फत प्रोफेसर विजेंद्रसिंह शेखावत यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी कार्यक्रम घेण्यात येतात. पाणसई गावात अनेक सुख सुविधा सुद्धा या कॉलेजमार्फत उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
दि. ३० डिसेंबर रोजी पाणसई, करंजेवाडी, मुठवली आणि इतर गावांतील प्राथमिक शाळेतील मुलांना बोलावून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. एकूण ३५० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यां मार्फत विविध प्रकारचे नृत्य सादर करण्यात आले. आर. डी. नॅशनल महाविद्यालय तर्फे पाणसई गावात गेली दहा वर्षात अनेक कामे झाली आहेत. महाविद्यालयाने पाणसई गाव दत्तक घेतले असुन दरवर्षी प्राध्यापक विजेंद्रसिंह शेखावत यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी नवनवीन उपक्रम राबवित असतात. त्यांच्या मार्फत शैक्षणिक, सामाजिक असे एक ना अनेक समजोपोयोगी कार्यक्रम करण्यात येतात.
या कार्यक्रमाला विलास शिंदे, संतोष मोरे, विद्यार्थी, शिक्षक, नागरिक, आर डी नॅशनल महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे आर डी नॅशनल कॉलेज एन एन एसच्या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.





0 टिप्पण्या