माणगावात सकाळच्या पारी वासुदेव आला स्वच्छतेचा संदेश ग्रामस्थांना देऊनी गेला

 माणगावात सकाळच्या पारी वासुदेव आला 

स्वच्छतेचा संदेश ग्रामस्थांना देऊनी गेला


पोलीस प्रवाह न्यूज

माणगांव : दि. ३०- शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२२ कार्यक्रमांतर्गत माणगाव नगरपंचायतीने "स्वच्छ गाव सुंदर गाव" संकल्पनेतून नगरपंचायत हद्दीतील ग्रामस्थांना स्वच्छतेच्या बाबतीत जनजागृती व्हावी हा उद्देश नजरेसमोर ठेवून माणगावात सकाळच्या पारी वासुदेवाला आणून व पथनाट्याद्वारे नगरपंचायत हद्दीत सर्वत्र फिरून ग्रामस्थांना स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.

माणगावात शुक्रवार दि.३० डिसेंबर २०२२ रोजी नगरपंचायतीने अरुणोदय सुशिक्षित बेरोजगार संस्था खरसई ता. म्हसळा या संस्थेला आमंत्रित करून यांतील कलाकार निहार धुमाळ यांनी वासुदेवाच्या भूमिकेत कला सादर करून माणगावकरांना स्वच्छतेचा संदेश दिला. तसेच या संस्थेच्या सुंदर अशी वसुंधरा या पथनाट्याद्वारे यांतील कलाकार निहार धुमाळ(वासुदेव), सूचित जावरे, मिलिंद पायकोळी, प्रथमेश बोरकर, अर्चना वायकर, दीप्ती अंजर्लेकर, अनिश शिंदे, किशोर शिताले यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर करून नका,ओला व सुका कचरा वेगवेगळा ठेवा, वैयक्तिक स्वच्छतेबरोबर सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता ठेवा याबाबत माणगावकरांना संदेश देत जनजागृती केली. या कार्यक्रमास माणगाव नगरीचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, नगरपंचायतीचे स्वच्छता सभापती अजित तार्लेकर, नगरसेवक, नगरपंचायतीचे कर्मचारी, सार्वजनिक वाचनालयाचे कर्मचारी, सफाई कामगार आदी उपस्थित होते.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या