अरुण पवार आदर्श शिक्षकेत्तर कर्मचारी पुस्काराने सन्मानित.
माणगाव-दि. ३१- रायगड जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या संस्थांपैकी एक ओळखल्या जाणाऱ्या माणगाव येथील माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या अशोकदादा साबळे विद्यालय व माणगाव ज्युनिअर कॉलेजचे कर्मचारी प्रयोगशाळा सहाय्यक तसेच माणगाव तालुका पत्रकार सेवा संघाचे संस्थापक जेष्ठ पत्रकार अरुण तुकाराम पवार यांना संस्थेतर्फे "आदर्श शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार" देऊन माणगाव नगरीचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार व मुख्याधिकारी संतोष माळी यांच्या हस्ते व संस्थेचे अध्यक्ष अँड.राजीव साबळे यांच्या विशेष उपस्थितीत सन्मानपत्र,सन्मानचिन्ह,व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.अरुण पवार यांना उपरोक्त संस्थेकडून आदर्श शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार मिळाल्याने त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
अरुण पवार हे माणगाव नगरपंचायत हद्दीतील खांदाड गावचे रहिवाशी असून त्यांचे वडील कै. तुकाराम पवार हे प्राथमिक शिक्षक होते. अरुण पवार यांनी माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या अशोकदादा साबळे विद्यालय व ज्युनियर कॉलेजमध्ये गेली ३५ वर्ष प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून सेवा बजावली आहे. दहावी, बारावीतील विद्यार्थ्यांना ते नेहमीच उत्कृष्ट असे मार्गदर्शन करून प्रोत्साहन देत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अरुणदादा म्हणून त्यांची खास करून ओळख आहे. आपली नोकरी सांभाळून ते गेली ३५ वर्ष पत्रकार म्हणूनही काम करीत आहेत. आपल्या धारदार व अभ्यासपूर्ण लेखणीने त्यांनी माणगाव तालुक्यातील तसेच रायगड जिल्ह्यातील अनेक प्रश्न व समस्यांवर आवाज उठवून लोकप्रतिनिधी व शासनाचे लक्ष वेधून ते मार्गी लावले आहेत. शिक्षण संस्थेत काम करताना आपल्या सेवेशी तत्पर राहून संस्था उन्नतीसाठी नेहमीच योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या कार्याची दखल माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाने घेऊन त्यांची आदर्श शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कारासाठी निवड केली. त्यांना अशोकदादा साबळे विद्यालय व माणगाव ज्युनिअर कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात शुक्रवार दि.३० डिसेंबर २०२२ रोजी पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी संस्थेचे सेक्रेटरी कृष्णाभाई गांधी, स्कुल कमिटी चेअरमन नरेंद्र गायकवाड, माणगाव नगरीचे उपनगराध्यक्ष सचिन बोंबले, बाळासाहेबांची शिवसेना तालुकाप्रमुख अँड,महेंद्र मानकर, जेष्ठ विधिज्ञ अँड.विनोद घायाळ, संस्थेचे पदाधिकारी नितीन बामगुडे, माजी उपनगराध्यक्ष रत्नाकर उभारे, नगरसेवक अजित तार्लेकर, कपिल गायकवाड, राजेश मेहता, दिनेश रातवडकर, नगरसेविका शर्मिला सुर्वे, नंदिनी बामगुडे, ममता थोरे, रिया उभारे, सुविधा खैरे, लक्ष्मी हिलम, स्वीकृत नगरसेवक बाबुराव निंबाळकर, हेमंत शेट, द.ग.तटकरे महाविद्यालयाचे प्राचार्य बी.खामकर, सुधाकर नारायण शिपूरकर व गणेश वाघरे इंग्लिश मिडीयम स्कुलच्या प्राचार्य मनीषा मोरे आदींसह शिक्षक वर्ग, पालक, नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




0 टिप्पण्या